बॉलिवूडच्या ‘या’ नायिकांचे होते अंडरलवर्ल्डशी संबंध
देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक मुली बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी येतात. पण सगळ्यांना यश मिळतंच असं नाही. काहीजणी अल्पावधीतच लोकप्रिय होतात, पण तेवढ्याच वेगाने लोकांच्या विस्मरणातही जातात. काही अभिनेत्री मेहनतीने आपलं स्थान निर्माण करतात, तर काही या सिनेसृष्टीला रामराम ठोकून निघून जातात. पण काही जणी मात्र झटपट यशस्वी व्हायच्या नादात चुकीचा मार्ग निवडतात आणि केवळ आपली कारकीर्दच नाही, तर आपल्या आयुष्यही बरबाद करतात. बॉलिवूडमधल्या अंडरवर्ल्डशी संबंधित अशाच काही नायिकांबद्दल (Bollywood actresses and their underworld connection) –
सोना मस्तान – हाजी मस्तान
‘सोना’ या अभिनेत्रीबद्दल तशी फारशी कोणाला माहिती नसेल. आवारा बादल (१९६४), बिखरे मोती (१९७१), आदमखोर (१९८६) अशा चित्रपटांमधून झळकलेली ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये स्थिरावायच्या आधीच डॉन हाजी मस्तानची तिच्यावर नजर पडली. पहिल्याच भेटीत हा डॉन तिच्या प्रेमात पडला.
असं म्हणतात की, सोना बरीचशी मधुबालासारखी दिसायची. डॉन हाजी मस्तान मधुबालाचा खूप मोठा ‘फॅन’ होता. पण मधुबालावरचे प्रेम व्यक्त करण्याआधीच मधुबाला हे जग सोडून गेली होती. त्यानंतर त्याने सोनाला बघितलं. ती मधुबालासारखीच दिसते म्हटल्यावर डॉन बघताक्षणी तिच्या प्रेमात पडला. त्यांनतर दोघांनी लग्न केलं. पण लग्नानंतर अल्पावधीतच हाजी मस्तानचा मृत्यू झाला आणि सोना एकाकी पडली. काही वर्षांपूर्वी २०१४ साली सोना हे जग सोडून गेली.
मंदाकिनी – दाऊद इब्राहिम
राम तोरी गंगा मैली सारख्या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री मंदाकिनीचं नाव दाऊद इब्राहिमशी जोडले गेलं होतं. त्या काळात माध्यमांमध्ये या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. तसंच एका क्रिकेट सामन्यादरम्यान दोघं एकत्र दिसल्याच्याही बातम्या आल्या होत्या. मात्र मंदाकिनीने नेहमीच दाऊदसोबतचे संबंध नाकारले. अर्थात तरीही या बातमीमूळे तिच्या कारकिर्दीला ब्रेक लागलाच.
पुढे मंदाकिनीने १९९० साली डॉ. काग्युर टी. रिनपोचे ठाकूर या बौद्ध भिक्षुशी विवाह केला. सध्या ती आपल्या दोन मुलांसह आपल्या संसारात रममाण झाली असून तिने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे. या जोडप्याला रब्बील नावाचा मुलगा आणि रब्जे इनाया नावाची मुलगी आहे. बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर मंदाकिनी दलाई लामांची अनुयायी बनली आहे. सध्या ती तिबेटी योगाचे क्लास घेते, तर तिचे पती तिबेटी हर्बल सेंटर चालवतात. (Bollywood actresses and underworld connection)
अनिता आयुब – दाऊद इब्राहिम
अनिता आयुब ही मूळची पाकिस्तानी अभिनेत्री असून तिने १९९३ साली देव आनंद लिखित आणि दिग्दर्शित ‘प्यार का तराना’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांनतर १९९४ सालच्या गँ’गस्टर’ चित्रपटातही दिसली होती. पुढे तिच्या आणि दाऊद इब्राहिम यांच्या नात्याबद्दलच्या चर्चा माध्यमांमध्ये चर्चिला जाऊ लागल्या आणि तिच्या करिअरला ब्रेक बसला. इतकंच नाही तर, १९९५ साली निर्माते जावेद सिद्दीकी यांनी अनिताला आपल्या चित्रपटात घेण्यास नकार दिल्यामुळेच दाऊदने त्याची हत्या केल्याच्या बातम्याही त्यावेळी आल्या होत्या.
ममता कुलकर्णी – विकी गोस्वामी
तिरंगा, आशिक आवरा, वक्त हमारा है, करण अर्जुन, क्रांतिवीर, बाझी, यासारख्या हिट चित्रपटांमधून झळकलेली ममता कुलकर्णी ही एकेकाळी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री होती. पण बोल्ड फोटोशूट आणि , डॉन विकी गोस्वामीसोबतच्या तिच्या नात्यामुळे तिची कारकीर्द उद्ध्वस्त झाली. ममताने विकिसोबत लग्न केल्याच्या चर्चा तेव्हा चांगल्याच रंगल्या होत्या.
त्यांनतर २०१४ साली केनियामध्ये ममता आणि विकी दोघानांही ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्याची बातमी आली होती. टाइम्स ऑफ इंडियामधील लेखानुसार ममता कुलकर्णी सध्या केनियामध्ये असून तिने केनियास्थित भारतीय वंशाचा व्यावसायिक उरू पटेल सोबत प्रॉडक्शन कंपनी सुरू केली आहे. यामध्ये असंही म्हटलं आहे की, ममताने तिचे नाव बदललं असून आता तिला ओळखणंही कठीण आहे. (Bollywood actresses and underworld connection)
मोनिका बेदी – अबू सालेम
मोनिका बेदी ही अभिनेत्री तशी बॉलिवूडमध्ये कधी यशस्वी नव्हतीच. तिची आणि अबू सालेमची भेट झाली आणि तिला चित्रपटांमध्ये भूमिका मिळू लागल्या. पण अर्थात तिचा कोणताही चित्रपट सुपरहिट झाला नाही. मोनिकाचे अबू सालेमशी असणारे संबंध सर्वासमोर उघड झाले. त्यानंतर तिने अबूशी लग्न करून इस्लाम धर्माचा स्वीकार केला.
===================
हे ही वाचा: ‘या’ कारणासाठी किरण रावने आमिर खानला चक्क तीन आठवडे ठेवले कोंडून
परपुरुषाचा स्पर्श नको म्हणून ‘या’ अभिनेत्रीने नाकारली चक्क नायिकेची भूमिका…
==============
लग्नानंतर जेमतेम वर्षभरातच पोर्तुगीज पोलिसांनी दोघांना अटक केली आणि नोव्हेंबर २००३ मध्ये तिला बनावट प्रवासी कागदपत्रे बाळगल्याबद्दल २ वर्षांची शिक्षा झाली. तिची शिक्षा संपल्यानंतर, तिला आणि अबूला भारतीय पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. सप्टेंबर २००६ मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने मोनिकाला दोषी ठरवलं. फसवणूक, गुन्हेगारी योजना आणि बनावट पासपोर्ट वापरल्याच्या आरोपाखाली तिला ५ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. (Bollywood actresses and underworld connection)
सध्या मोनिका शिक्षा भोगून तुरुंगाच्या बाहेर पडली असून तिने आपल्या कारकिर्दीवर लक्ष केंद्रित केलं आहे, तर अबू सालेम तुरुंगात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत आहे.