डोंबिवलीत क्रिकेटचा महा धमाका; ८० Marathi Celebrities सिनेकलाकार भिडणार ‘डोंबिवलीकर

Manisha Koirala To Bhagyashree : बॉलिवूडचे हे स्टार्स आहेत राजघराण्यातील राजा-राणी!
बॉलिवूडचे कलाकार चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारतना दिसतात… बायोपिक म्हटलं की त्या भूमिकेला साजेशी किंवा पिरियॉडिक ड्रामा असेल तर राजा-राणीची देखील भूमिका साकारतात… पण हिंदी चित्रपटसृष्टीतील असे काही कलाकार आहेत जे खऱ्या खुऱ्या आयुष्यात राजघराण्यातून येतात... चला तर जाणून घेऊयात या कलाकारांबद्दल… (Bollywood Celebrities belong to royal family)
साऊथ-बॉलीवूड या दोन्ही फिल्म इंडस्ट्री अभिनय आणि सौंदर्याने गाजवणारी अभिनेत्री अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) ही राजघराण्यातून येते… हैदराबादचे राजा अकबर हैदरी यांची अदिती पणती आहे.. तसेच, मोहम्मद अकबर हैदरी यांची ती भाची असून ते आसामचे माजी राज्यपालही होते…

‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री ही महाराष्ट्रातील सांगलीमधील पटवर्धन या राजघराण्यातील सदस्य आहे… तिचं पूर्ण नाव श्रीमंत राजकुमार भाग्यश्री राजे पटवर्धन असं असून सांगलीचे राजा श्रीमंत विजयसिंह राव माधवराव पटवर्धन यांची ती लेक आहे… (Bhagyashree)

१८०४ ते १९७१ या काळात पतौडी संस्थानावर राज्य करणाऱ्या पतौडी या राजघराण्यातील दोन मेंबर बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहेत… सोहा अली खान (Soha Ali Khan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) हे दोन्ही सेलिब्रिटी बहिण भाऊ भारतीय क्रिकेट संघाचे कॅप्टन मन्सूर अली खान पतौडी यांची मुलं आहेत… नवाबी घराणेशाहीचा वारसा सारा, इब्राहिम, तैमुर आणि जहांगीर ही सैफ अली खानची मुलं चालवत आहेत…

शाहरुख खानसोबत ‘चक दे इंडिया’ चित्रपटात झळकलेली मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटगे (Sagarika Ghatage) हिचं घराणंही राजेशाही आहे… तिचे वडिल विजयेंद्र सिंहराव घाटगे हे इंदौरच्या शाही घराण्याचे वंशज आहेत… इंदौरचे महाराजा तुकोजीराव होळकर यांची तिसरी मुलगी सीताराजे घाटगेंचे विजयेंद्र हे सुपुत्र… सीताराजेंची पती कर्नल एफडी घाटगे हे कोल्हापूरच्या कसबा कागलमधील शाही कुटुंबाचे सदस्य आहेत..

बॉलिवूडमध्ये बॉल्ड आणि ग्लॅमरस भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या रिमा आणि रायमा सेन (Rima & Raima Sen) या बहिणी राजघराण्यातील आहेत… त्यांचे वडिल त्रिपुरातील राजघराण्यातील सदस्य असून त्यांची आजी इला देवी या कुच बेहारच्या राजकुमारी होत्या आणि त्यांची लहान बहिण जयपूरची राजकुमारी होती…

बॉलिवूडला आपल्या सहज सुंदर अभिनयाने मंत्रमुग्ध करणारे दिवंगत अभिनेते इरफान खान (Irfan Khan) हे देखील राजस्थानमधील राजघराण्यातून येतात… त्यांचे वडिल राजस्थान संस्थानातील प्रसिद्ध जमीनदार होते… तर त्यांची आई रॉयल टोंक हकीम या शाही कुटुंबातील सदस्य होती…

कॅन्सरसारख्या आजारावर मात करत ‘हिरामंडी’ ही लोकप्रिय वेब सीरीज आपल्या अभिनयाने दणाणून सोडणारी अभिनेत्री मनीषा कोईराला (Manisha Koirala) हीचं घराणं राजेशाही आहे… ९०च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळख असणारी मनीषा नेपाळच्या पर्यावरण मंत्र्याची मुलगी… तिचे आजोबा बिश्वेश्वर प्रसाद कोईराला हे नेपाळचे पंतप्रधान होते…

================================
हे देखील वाचा : Manisha Koirala :’बॉम्बे’चित्रपटातील ‘ते’ गाणं कसं झालं शुट?
================================
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi