
Box Office Collection : बॉलिवूड चित्रपटांनी पहिल्याच सहामाहीत पार केला २००० कोटींचा आकडा!
हिंदी चित्रपटसृष्टीची आर्थिक बाजू सध्या चांगलीच भरभक्कम झालेली दिसतेय… २०२५ हे वर्ष सुरु झाल्यापासून ते आत्तापर्यंतच्या पहिल्या सहामाहीत बॉलिवूड चित्रपटांनी १००० कोटींच्या पुढे कमाई केली आहे… येत्या काळात तर १०० ते १००० कोटीच्या पुढे बजेट असणारे चित्रपट येणार असल्यामुळे त्यांच्याकडून तर फारच अपेक्षा मेकर्स आणि प्रेक्षक लावून बसले आहेत… मात्र, सध्या २०२५च्या पहिल्या ६ महिन्यात कोणत्या चित्रपटांनी किती कमाई केली आहे जरा जाणून घेऊयात…

तर, बॉलिवूडने पहिल्या सहामाहीत जवळपास २०५० कोटी रुपयांनी कमाई केली आहे… २०२४ वर्षाच्या तुलनेने २५ ते ३० टक्के अधिक कमाई या वर्षात केवळ ६ महिन्यातच केली आहे…विशेष म्हणजे जानेवारी ते जुलै महिन्यापर्यंत रिलीज झालेल्या अनेक चित्रपटांपैकी ६ चित्रपटांनीच १०० कोटींचा टप्पा पार केला होता… यात लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल अभिनित ‘छावा’ चित्रपटाने दमदार कामगिरी केली आहे… या वर्षी २०० कोटींचा टप्पा कमी वेळात पार करण्याचा पहिला मान या चित्रपटाने मिळवला…

तसेच, अजय देवगण आणि रितेश देशमुख यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या रेड २ चित्रपटाने १७८ कोटींच्या कमाईसह दुसरं स्थान पटकावलं आहे… त्यानंतर,अक्षय कुमारच्या हाऊसफुल्ल ५ चा नंबर लागत असून आतापर्यंत १५९ कोटींच्या घरात चित्रपटाची कमाई आहे, तर ‘स्काय फोर्स’ने १३१ कोटी, आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ने १५० कोटी, सलमान खानच्या ‘सिकंदर’ने १०३ कोटींचा आकडा पार केला आहे… दरम्यान, २०२३ या वर्षात शाहरुख खानच्या जवान आणि पठाण या दोन्ही चित्रपटांनी दमदार कामगिरी करत १००० कोटींचा गल्ला जमवला होता…
================================
हे देखील वाचा: Housefull 5 मध्ये दगडूची भूमिका नाना पाटेकर नाही तर ‘या’ सुपरस्टारला ऑफर केली होती
=================================
दरम्यान, २०२५ मध्ये आता येत्या काळात रिलीज होणाऱ्या चित्रपटांकडून लोकांच्या अपेक्षा फार अधिक आहेत… यात ‘सन ऑफ सरदार २’, ‘जॉली एल.एल.बी ३’, ‘वॉर २’, ‘अल्फा’, थामा या चित्रपटांकडून १००० कोटींचा टप्पा फार कमी कळात त्यांनी पार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे… याशिवाय ४००० कोटींच्या रामायण चित्रपटाकडून तर बजेटच्या दुप्पट कमाई झाली पाहिजे ही आशा आहेच…यासोबतच,२०२३ मध्ये २००० कोटी, २०२४ मध्ये १५५० कोटी तर, आत्तापर्यंत २०२५ मध्ये २०५० कोटी कमावले आहेत… आता उरलेल्या वर्षात बॉलिवूड चित्रपट अधिक उत्तम कामगिरी करतील हे निश्चित…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi