दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
कारकिर्दीच्या सुरुवातीला बॉलिवूडच्या ‘या’ लोकप्रिय कलाकारांनी केलं आहे बॅकग्राउंड डान्सरचं काम
मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांना मिळणारा पैसा, प्रसिद्धी आणि एकूणच स्टारडम अनेकांना दिसतं, पण त्यामागची त्यांची मेहनत लोकांना दिसत नाही. अनेक कलाकारांनी प्रचंड स्ट्रगल करून मेहनतीने आपली कारकीर्द घडवली आहे. काही कलाकारांनी छोट्या भूमिकेपासून, तर काहींनी अगदी बॅकग्राउंड डान्सरचं कामही केलं आहे. अशाच काही कलाकारांबद्दल (Bollywood star as background Dancers)
शाहिद कपूर
शाहिद कपूरने बॉलिवूडचे प्रसिद्ध कोरिओग्राफर शिमक दावर यांच्या डान्स इन्स्टिट्यूटमध्ये नृत्याचं अधिकृत शिक्षण घेतलं आहे. त्याने ‘दिल तो पागल है’ आणि ताल चित्रपटातील ‘कहीं आग लगे’ या गाण्यांमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलं आहे. तसंच ‘आँखो मी तेरा ही चेहरा’ या अल्बम सॉंगमध्येही तो दिसला होता.
रेमो डिसोझा
बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर ‘रेमो डिसोझा’ एक अभिनेता आणि दिग्दर्शकही आहे. पण या लोकप्रिय कोरिओग्राफरने एके काळी ‘बॅकग्राउंड डान्सर’ म्हणून काम केलं आहे. १९९७ साली आलेल्या ‘परदेस’ या चित्रपटात तो शाहरुख खानवर चित्रित झालेल्या ‘मेरी मेहबूबा’ या गाण्यात दिसला होता. या चित्रपटात त्याने छोटीशी भूमिकाही केली होती.
सुशांत सिंग राजपूत
सुशांत सिंग राजपूत आज जरी आपल्यात नसला तरी त्याने बॉलिवूडच्या कित्येक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याला पहिला ब्रेक मिळाला होता तो ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे. या मालिकेत तो मुख्य भूमिकेत होता. पण त्या आधी त्याने IIFA पुरस्कार आणि धूम 2 च्या टायटल ट्रॅकमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलं होतं. तसंच मेलबर्न येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स (२००६) मध्ये तो चक्क ऐश्वर्या राय -बच्चन सोबत थिरकताना दिसला होता. सुशांत बॉलिवूडचे प्रसिद्ध कोरिओग्राफर श्यामक दावर यांचा विद्यार्थी होता.
दिया मिर्झा
‘रहना है तेरे दिल में’ या ‘म्युझिकल हिट’ चित्रपटामधून आपली कारकीर्द सुरु करणाऱ्या दिया मिर्झाने ‘एन स्वासा कात्रे’ या तामिळ चित्रपटातील ‘जुम्बलाक्का’ या गाण्यात बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलं होतं. (Bollywood star as background Dancers)
पंकज त्रिपाठी
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर जबरदस्त लोकप्रिय ठरलेला अभिनेता पंकज त्रिपाठी याने प्रचंड स्ट्रगल केला आहे. पण ओटीटी वरचा हा कालीन भैय्या ‘ओंकारा’ चित्रपटातील ‘नमक इश्क का’ या गाण्यामध्ये थिरकला आहे. अर्थात तेव्हा पंकज त्रिपाठी हे नावही कोणाला माहिती नव्हतं. पण आज जर का तुम्ही बघितलं तर, कालीन भैय्याचे लटके- झटके बघून तुम्ही हैराण व्हाल.
दीपिका पदुकोण
बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी दीपिका एक यशस्वी मॉडेल होती. काही जाहिराती तसंच किंगफिशरच्या कॅलेंडरवरही ती दिसली होती. सन २००६ मध्ये हिमेश रेशमियाने त्याचा पहिला अल्बम ‘आप का सुरूर’ प्रदर्शित केला होता. या अल्बममध्ये त्याने दीपिकाला संधी दिली होती. या अल्बममधील ‘नाम है तेरा’ या गाण्यामध्ये दिसली होती. (Bollywood star as background Dancers)
डेझी शाह
“अवर बिझनेस इज अवर बिझनेस. नन ऑफ युअर बिझनेस..” हा डायलॉग म्हणणारी रेस 3 मधली नायिका डेझी शाह आठवतेय का? अभिनेत्री म्हणून आपली कारकीर्द सुरु करण्यापूर्वी तिने बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केले होते. २००३ साली प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘तेरे नाम’ या चित्रपटातील ‘लगन लागी’ या गाण्यामध्ये ती दिसली होती. डेझीने बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांची सहाय्यक म्हणूनही काम केलं आहे.
काजल अगरवाल
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री काजल अगरवाल बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झाली ती सिंघम या चित्रपटामुळे. सिंघम मध्ये ‘साथिया…’ या लोकप्रिय गाण्यात मुख्य अभिनेत्रींच्या भूमिकेत दिसलेली काजल ‘क्यों… हो गया ना..’ या चित्रपटातील ‘उलझाने’ या गाण्यात ऐश्वर्या राय – बच्चनसोबत बॅकग्राउंड डान्सर म्हणून दिसली होती. (Bollywood star as background Dancers)
===============
हे ही वाचा: …तर बिग बी दिसले असते ‘खलनायक’!
अभिनेता गोविंदाच्या उत्तराने संगीतकार नौशाद यांच्या डोळ्यात पाणी का आले?
===============
कोणतंही काम हे फक्त काम असतं. ते छोटं किंवा मोठं नसतं. बॉलिवूडमध्ये आज यशस्वी असणाऱ्या कलाकारांनी अगदी छोट्या छोट्या कामांपासून आपली कारकीर्द सुरु केली. प्रचंड मेहनतीने त्यांनी यश संपादन केलं आहे. यशाचा प्रवास सोपा नसतो, हे आपण कायम लक्षात ठेवायला हवं.