
बॉबी देओल ते Akshaye Khanna; बॉलिवूडचे ‘हे’ खलनायक नायकांवर पडले भारी!
बॉलिवूड इंडस्ट्री ही स्टार ड्रीव्हन फिल्मी दुनिया आहे… चित्रपटाच्या कथेपेक्षा चित्रपटाचा हिरो कोण असणार? यावर तो चित्रपट सुपरहिट की सुपरफ्लॉप हा थप्पा आधीच लागतो… अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, वरुण धवन, शाहिद कपूर अशा एकाहून एक ग्रेट हिरोंनी हिट चित्रपट आत्तापर्यंत बॉलिवूडला दिले… पण गेल्या काही काळात काही चित्रपट हे हिरोंनी नाही तर विलन्सनी (Villains In Bollywood) गाजवले आहेत… आणि सध्या याचं ताजं उदाहरण म्हणजे आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ (Dhurandhar)… बरं आताच नाही तर अगदी हिंदी चित्रपटसृष्टीत मोगॅम्बो, गब्बर सिंग असे गाजलेले खलनायक आधीही होऊन गेले आहेतच की… चला तर मग जाणून घेऊयात बॉलिवूडच्या काही अशा चित्रपटांबद्दल ज्यातील नायकापेक्षा खलनायक जास्त भाव खाऊन गेले आहेत…

२०१४ मध्ये आलेल्या ‘एक व्हिलन’ (Ek Villian) चित्रपटात नायक होता सिद्धार्थ मल्होत्रा पण त्याच्यापेक्षा मराठमोळ्या रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) साकारलेला व्हिलन विशेष गाजला होता… याशिवाय ‘अग्निपथ’ चित्रपटाचा नायक होता ह्रतिक रोशन (Hrithik Roshan) पण चित्रपटातील संजय दत्तने (Sanjay Dutt) साकारलेला खलनायक तुफान चर्चेत होता… यानंतरचा चित्रपट म्हणजे ‘पद्मावत’… नायक होता शहिद कपूर पण रणवीर सिंगचा (Ranveer Singh) खलनायक शाहिद आणि दीपिका पादूकोणपेक्षा वरचढ ठरला होता… (Entertainment News)

बरं इथवरच हिट ठरलेल्या खलनायकांची यादी थांबत नाही… २०२३ मध्ये आलेला ‘अॅनिमल’ रणबीर कपूरच्या एका वेगळ्याच अवतारामुळे गाजला… पण कानामागून येत बॉबी देओलने (Bobby Deol) साकारलेली भूमिका अख्खं लाईमलाईट खाऊन गेली… त्यानंतर विकी कौशलचा (Vicky Kaushal) ‘छावा’ चित्रपट आला… छत्रपती संभाजी महाराजांची त्याने निभावलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेलीच, परंतु, अक्षय खन्नाने साकारलेला औरंगजेब काही अंशी वरचढ होता…
या पाठोपाठ आलेला ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपट तर सरसच ठरला आहे… या चित्रपटाचा मेन हिरो होता रणवीर सिंग पण अक्षय खन्नाचा रेहमान डकैत मुख्य आकर्षण ठरला आहे… बरं यात केवळ अक्षयच नाही तर अर्जून रामपाल (Arjun Rampal) यानेही साकारलेला खलनायक लक्षवेधी आहे… एकूणच काही गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूडचं स्टारडम अभिनेत्यांमुळे तर आहेच पण हळूहळू खलनायक प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहेत हे देखील तितकंच खरं…. (Bollywood’s Villians)
================================
हे देखील वाचा : Dhurandhar चं ‘हे’ गाणं धुमाकूळ घालतयं… पण ते आहे कोणाचं ?
================================
बरं, खलनायक हा नायकाइतकाच तगडा असायला हवा ही कॉन्सेप्ट खरं तर हॉलिवूड आणि साऊथमध्ये फार दिसून येते… आणि आता हळूहळू बॉलिवूडही त्याकडे वळत असून चित्रपटात कोणता नायक असणार यापेक्षा अधिक महत्व खलनायक कोण असणार याकडे दिलं जातंय असं चित्र दिसून येत आहे…. या सगळ्यात आणखी एक प्रकर्षाने जाणवलेली बाब म्हणजे एक व्हिलन असो किंवा ‘अॅनिमल’ जे खलनायक गाजले ते सगळे ९०च्या दशकातील स्टार्स होते… त्यामुळे नवोदित कलाकारांना हा एक रिमांईडर आहे की जुनं तेच सोनं…! (Bollywood News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi