Madhuri Dixit : सलमान-शाहरुख नव्हे तर ‘या’ अभिनेत्यासोबत सर्वाधिक चित्रपटात

Raid 2 : अजय-रितेशच्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; सांगितले ‘हे’ मोठे बदल
१ मे २०२५ रोजी बॉक्स ऑफिसवर धाड टाकण्यासाठी अजय देवगण (Ajay Devgan) आणि रितेश देशमुख Ritesh Deshmukh) यांचा ‘रेड २’ (Raid 2) चित्रपट येत आहे. एकीकडे चित्रपटाचं प्रमोशन जोरदार सुरु असून दुसरीकडे सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही सीन्सवर कात्री लावली आहे. खरं तर चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून IRS ऑफिसर अमय पटनायकची ही ७५ वी रेड यशस्वी ठरणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यापूर्वी सेन्सॉरने कुठल्या सीन्सवर कात्री मारली आहे जाणून घेऊयात… (Raid 2 movie)

दरम्यान, ‘बॉलीवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने ‘रेड २’ चित्रपटाला हिरवा झेंडा दाखवला होता. पण आता आता बोर्डाने रिलीजच्या मुहूर्तावरच निमार्त्यांना दोन डायलॉग्स बदलण्यास सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिथे रेल्वे मंत्री शब्दाच्या जागी मोठे मंत्री असा बदल केला आहे. तसंच चित्रपटाच्या सुरुवातीला येणारा ८ सेकंदाचा “पैसा, हथियार, ताकत” हा डायलॉग हटवण्यास सांगितलं आहे.(Bollywood trending news)

‘रेड २’ चित्रपटाच्या निर्मितीची धुरा भूषण कुमार, अभिषेक पाठक, कृष्ण कुमार आणि गौरव नंदा यांनी सांभाळली असून राज कुमार गुप्ता यांनी दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात अजय देवगण, रितेश देशमुख, वाणी कपूर (Vaani Kapoor) व्यतिरिक्त रजत कपूर, सौरभ शुक्ला, सुप्रिया पाठक आणि अमित सियाल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. (Entertainment news)
===========
हे देखील वाचा : Raid 2 : अजय देवगण की रितेश देशमुख? रेड २ साठी सर्वाधिक मानधन कोणाला?
===========
२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेड’ (Raid) चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. पहिल्या भागात अजय देवगण आणि सौरभ शुक्ला आमनेसामने होते. आता ‘रेड २’ मध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. रितेश देशमुखची दादा मनोहर भाई भूमिका प्रेक्षकांना कितपत आवडते हे आता १ मे २०२५ लाच समजणार आहे. (Raid 2 Release)