
Chhaava : ४०० कोटींचा आकडा पार करणारा यंदाचा पहिला चित्रपट
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाने २०२५ या वर्षात बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम केला आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी रिलीज झालेल्या ‘छावा’ चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन आणि त्यांचे वेगवेगळे पैलु दाखवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि विकी कौशल यांचा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट असून याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींचा टप्पा पार करत एक नवा इतिहास रचला आहे. जाणून घेऊयात ‘छावा’ चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर १५ व्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमवला. (Chhaava)
चित्रपटगृहातून सध्या एकच गर्जना ऐकू येतेय ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो… सर्वच वयोगटातील प्रेक्षक ‘छावा’ (Chhaava Box Office Collection) चित्रपट संपल्यानंतर डोळ्यांमध्ये अश्रु गेऊनच बाहेर पडताना दिसत आहेत. पण बॉक्स ऑफिसचा निकाल पाहता आपल्या चेहऱ्यावर हसू उमटवणारं आणि छ६पती संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचा चित्रपट इतकी मोठी कामगिरी करत असल्याचा अभिमान देणारा क्षण आहे. सॅकनिल्कच्या माहितीनुसार ‘छावा’ ने १५ व्या दिवशी उत्तम कमाई केली आहे. (Bollywood update)

Vicky Kaushal च्या ‘छावा’ने ११ व्या दिवशी चित्रपटाने १८ कोटी, १२ व्या दिवशी १८.५ कोटी, १३ व्या दिवशी २३ कोटी, १४ व्या दिवशी १३.२५ कोटी, १५ व्या दिवशी १३.४२ कोटींची कमाई करत आत्तापर्यंत एकूण ४१२.५० कोटींचा गल्ला जमवला आहे. २०२५ या वर्षात जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये ‘इमर्जन्सी’, ‘आझाद’, ‘मेरे हसबंड की बीवी’, ‘फतेह’, ‘देवा’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. पण या सगळ्यांना मागे टाकत ‘छावा’ने ४०० कोटींचा टप्पा पार करत पहिलं स्थान पटकावलंय. (Chhaava box office collection 2025)
============
हे देखील वाचा : Sarang Sathaye : “प्रेक्षक मला मारायला निघालेत…; सारंग असं का म्हणाला?
============
‘छावा’ या चित्रपटातून खरं तर केवळ छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रमच नाही तर वैयक्तिक जीवनात ते कसे होते? हिंदु धर्मा प्रती त्यांची आस्था काय होती? ते माणूस म्हणून कसे होते असे वेगवेगळे पैलु उलगडण्याचा प्रयत्न दिसून येतो. शिवाय, २१व्या शतकातील आजच्या तरुण पिढीला हॉलिवूडमध्ये सुपरहिरो खरे हिरो वाटतात; त्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या या रिअल हिरोबद्दलची माहिती सांगणारा छावा चित्रपट नक्कीच आहे आणि एक उत्तम कलाकृती आहे यात शंकाच नाही. (Chhatrapati Sambhaji Maharaj)