
Vicky Kaushal : ‘छावा’तील ‘तो’ थरारक सीन मराठमोळ्या मुलीवर झालाय चित्रित!
Vicky Kaushal च्या ‘छावा’ चित्रपटाने प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळवत बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा गल्ला पार करत नवा इतिहास रचला आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेला ‘छावा’(Chhaava) आजवरच्या सुपरहिट ठरलेल्या अनेक हिंदी चित्रपटांचा रेकॉर्ड मोड़ून काढत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची कथा दाखवण्यात आली. त्यामुळे साहजिकच यात खूप अॅक्शन सीन्स आहेत. यात एका सीनमध्ये मुघल एका मुलीला जीवंत जाळतानाचे थरारक दृश्य देखील आहे. पण तुम्हाला माहित आहे का हा सीन एका मराठमोळ्या मुलीवर चित्रित केला गेला आहे. (Bollywood trending news)
‘छावा’ चित्रपटात एक सीन प्रेक्षकांना धडकी भरायला लावणारा आहे. मुघल सैन्य स्वराज्याच्या दिशेने हल्ला करण्यासाठी येत असताना एक मुलगी गुरांना चारा चरवण्यासाठी डोंगरावर गेलेली दिसते. आणि त्याचवेळी ती मुघलांच्या निशाण्यावर येते. तिथेच ते तिला जीवंत जाळून टाकतात. हा सीन जिच्यावर चित्रीत झाला ती मुलगी आहे साक्षी सकपाळ (Sakshi Sakpal). (Bollywood tadaka)

दरम्यान, स्वत: साक्षी सकपाळ हिने सोशल मिडियावर हा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे की, “आगीच्या थरारक सीनचा BTS व्हिडीओ तुमच्याबरोबर शेअर करतेय…’छावा’मध्ये काम करताना खूप चांगला अनुभव आला. मी आनंदी आहे आणि अर्थातच ती ‘आग’ अजूनही मनात कायम आहे. सेटवर सर्वांनी मला पाठिंबा दिला, मला मदत केली यासाठी खूप खूप धन्यवाद”. (Chhaava Movie)
===========
हे देखील वाचा : Chhaava : चित्रपटातील एका गाण्यात दिसले प्रभू श्रीराम आणि मारुतीराय
===========
‘छावा’ चित्रपटात विकी कौशलसह Rashmika Mandana, अक्षय खन्ना, दिव्या दत्ता, सुव्रत जोशी, संतोष जुवेकर, सारंग साठ्ये, किरण करमरकर अशा अनेक कलाकारांनी महत्वपुर्ण भूमिका साकारल्या आहेत. सॅकनिल्कच्या माहितीनुसार, ‘छावा’ चित्रपटाने आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर ५२५.८ कोटींची कमाई केली आहे. तसेच, ७ मार्च २०२५ रोजी हा चित्रपट तेलुगू भाषेत प्रदर्शित झाला असून तेथील प्रेक्षकही चित्रपटाला तुफान प्रतिसाद देत आहेत. (Chhaava box office collection)