Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

Chhaava Movie : विकी कौशलचा ‘छावा’ संसदेत दाखवला जाणार
विकी कौशलच्या ‘छावा’ (Chhaava movie) चित्रपटाने सध्या प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपटाने ५५० कोटींचा टप्पा पार केला असून लवकरच हा चित्रपट ६०० कोटींपर्यंत पोहोचण्याच्या मार्गात आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टतही धुमाकूळ घालत आहे. आता लवकरच या चित्रपटाचं खास स्क्रिनिंग संसदेत होणार आहे. कधी जाणून घ्या… (Chhaava movie screening)
मिळालेल्या महितीनुसार २७ मार्च २०२५ रोजी संसदेच्या लायब्ररी इमारतीमधील बालयोगी ऑडिटोरियममध्ये छावा चित्रपटाचं स्क्रिनिंग होणार आहे. या खास स्क्रिनिंगला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) केंद्रीय मंत्री खासदार उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे ‘छावा’ चित्रपटाची संपूर्ण टीम या स्क्रिनिंगवेळी हजर असणार आहे. (Entertainment news)

‘छावा’ चित्रपटात विकी कौशल (Vicky Kaushal) याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली असून रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसली आहे. तसेच, या चित्रपटात संतोष जुवेकर, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी, किरण करमरकर, शिवराज वाळवेकर या मराठी कलाकारांनी विशेष भूमिका साकारल्या आहेत. (Bollywood update)
===========================
हे देखील वाचा: Chhaava : महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी झाले छावा सिनेमाचे शूटिंग
===========================
‘छावा’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २२५.२८ कोटी, दुसऱ्या आठवड्यात १८६.१८ कोटी, तिसऱ्या आठवड्यात ८४.९४ कोटी, चौथ्या आटवड्यात ४३.९८ कोटी, पाचव्या आठवड्यात ३१.०२ कोटी, सहाव्या आठवड्यात १०.०५ कोटी कमवत आत्तापर्यंत. ५८१.४५ कोटींची कमाई केली आहे. (Chhaava box office collection)