Yere Yere Paisa 3 : मराठी चित्रपटांसाठी महाराष्ट्रात पुन्हा ‘खळ्ळ

‘वो मराठी अॅक्टर जैसा नही करने का’ दिग्दर्शकाचा माज; Chhaya Kadam हिने चांगलचं सुनावलं
महाराष्ट्रात सध्या मराठी हिंदी भाषा वाद सुरु आहे. विशेष म्हणजे या महत्वाच्या विषयावर सेलिब्रिटी देखील आपली प्रामाणिक मतं मांडत मराठी भाषेचं अस्तित्व टिकावं यावर भर देत आहेत. अशातच जागतिक स्तरावर मराठी चित्रपटसृष्टीला महत्वाचा दर्जा मिळवून देणारी अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) हिने नुकताच एका हिंदी दिग्दर्शकासोबत काम करताना आलेला अनुभव शेअर केला आहे. त्या हिंदी भाषिक दिग्दर्शकाने मराठी कलाकारांना कमी लेखल्यानंतर छाया कदमने खरमरीत उत्तर देत त्यांना सुनावलं होतं… नेमकं काय म्हणाली होती छाया जाणून घेऊयात…(Bollywood News)

छाया कदम हिने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. अशात नुकत्याच एका हिंदी दिग्दर्शकासोबत काम करताना आलेला अनुभव शेअर करताना छाया म्हणाली की, “एका चित्रपटाच्या सेटवर एक दिल्लीचा दिग्दर्शक होता. शूटिंग वेळ इथे दोन-तीन वेळा माझ्यासमोर बोलला की, यार वो मराठी जैसा काम नही करने का… अरे यार वो मराठी ऍक्टर जैसा नही करने का… त्याचं हे बोलणं ऐकून मला एकदा रागच आला. आणि मग माझ्यातली मालवणी आणि कब्बडी खेळणारी मुलगी जागी झाली”. (Entertainment)
================================
हे देखील वाचा : Ajay Devgan : ‘सन ऑफ सरदार २’ मधील आणखी एका गाण्यामुळे अजय झाला ट्रोल!
=================================
पुढे छाया म्हणाली की, “माझं असं झालं की, अरे मग का करतोय तू मराठी चित्रपट? हिंदीत तुला कोणी विचारलं नाही का म्हणून तू इकडे आला. एका मराठी अभिनेत्रीला ती म्हणत होता… मग मी शेवटी शूटिंग थांबवलं. त्याला विचारलं – ये आप क्या बोल रहे हो. मला वाद घालायचा नाही. तू आधी माफी माग. आणि तुझी ज्यांना बोलतोयस ती मराठीतली मोठं नाव असलेली अभिनेत्री आहे. मग तिथलं वातावरण थोडं तंग झालं. कधी कधी आपल्यामध्ये बोलण्याची ही ताकद येते”. (Marathi Entertainment News)

यानंतर छाया म्हणाली की, “मी आयुष्यात बरीच माणसं कमावली. त्यामुळे या सेटवर मी जर बोलले की शूटिंग थांबवा तर माझं सगळे ऐकणारच हे मला माहीत होतं. कारण स्पॉटची मुलं, मेकअप टीम, लाइट्स मध्ये सगळे माझ्या ओळखीचे होते. मी त्यांची ताई आहे आणि ते माझे भाईलोग. मी सांगितलं शूट थांबवा आणि शूट थांबलं. त्यानंतर दिग्दर्शकाने माफी मागितली आणि काम करायला सुरुवात झाली”.
================================
हे देखील वाचा : Dia Mirza : ‘रेहना है तेरे दिल में’ फ्लॉप होता की हिट?
================================
दरम्यान, छाया कदम हिच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर ‘लापता लेडिज’, ‘All We Imagine As Light’, ‘Sisters Midnight’, ‘मडगांव एक्सप्रेस’, ‘झुंड’, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘अंतिम’, ‘न्युड’, ‘हंम्पी’, ‘सैराट’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत…. (Chhaya Kadam Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi