‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Comedy Queen Bharati Singh ४१व्या वर्षी दुसऱ्यांदा होणार आई; पतीसोबत गोड फोटो शेअर करत दिली बातमी !
कॉमेडीयन भारती सिंहच्या (Comedian Bharati Singh) घरात लवकरच आनंदाचा एक नवा क्षण येणार आहे , कारण ती दुसऱ्यांदा आई होणार आहे. भारतीने आपल्या चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर करत एक फोटो ही पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती पती हर्ष लिंबाचियासोबत (Harsh Limbachiyaa) दिसत आहे . या फोटोमध्ये ती आपल्या बेबी बंपला फ्लॉन्ट करत आहे आणि दुसऱ्यांदा गरोदर असल्याची बातमी तिने दिली आहे. भारती सिंहने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हर्ष लिंबाचिया सोबतचा एक गोड फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तिचा बेबी बंप स्पष्टपणे दिसत आहे, आणि त्या क्यूट मोमेंटसह ती सर्वांना सांगते की तिच्या घरात लवकरच दुसऱ्या बाळाचं आगमन होणार आहे. या सुंदर घोषणेने तिच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि हास्य फुलवले.(Bharti Singh Announces Second Pregnancy)

भारती आणि हर्ष यांच्या यापूर्वी एक गोड मुलगा आहे ज्याला सगळेच गोला म्हणून ओळखतात आणि आता त्यांचे कुटुंब आणखी वाढणार आहे. चाहत्यांकडून भारतीला भरभरून शुभेच्छा मिळत आहेत. भारतीच्या गोड बातमीनं तिच्या चाहत्यांना खूप आनंद दिला आहे, आणि आता सर्वजण तिच्या दुसऱ्या बाळाच्या आगमनाची वाट पाहत आहेत.

फोटो शेअर करत भारतीनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “आम्ही पुन्हा आई वडील होणार आहोत… आशीर्वाद, गणपती बप्पा मोरया।” भारतीच्या सोशल मीडिया पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या दुसऱ्या गरोदरपणाच्या बातमीला त्यांचे सेलिब्रिटी मित्र आणि चाहत्यांकडून उत्स्फूर्त अभिनंदन मिळत आहे. टीव्ही अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा यांनी इंस्टाग्रामवर कमेंट करत “अभिनंदन…” असं लिहिलं, तर अभिनेत्री अदा खाननं रेड हार्ट इमोजीसह या जोडप्याचं अभिनंदन केलं.(Bharti Singh Announces Second Pregnancy)
============================
हे देखील वाचा: लग्नाला यायचं हं! ‘या’ दिवशी होणार प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा लग्न सोहळा !
=============================
त्या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच, ईशा गुप्ता, दर्शन कुमार, कृष्णा मुखर्जी यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी देखील या गोड बातम्या पोस्टवर कमेंट करत भारती आणि हर्ष यांना अभिनंदन दिलं. युजर्सही यापासून मागे नाहीत. एक युजरने कमेंटमध्ये लिहिलं, “तुम्हा दोघांचं खूप खूप अभिनंदन…” आणि दुसऱ्या युजरनेही त्याच भावनेतून “तुम्हा दोघांचं अभिनंदन…” असं लिहिलं. माझ्या सर्व चाहत्यांनी, मित्र-मैत्रिणींनी आणि सेलिब्रिटींनी दिलेल्या या प्रेमाने भारती आणि हर्ष यांचे मन आनंदाने भरून गेले आहे. त्यांच्या या आनंदाच्या क्षणात सर्वांचं साथ असणं हेच त्यांच्यासाठी खूप खास असणार हे नक्की.