‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
दक्खनचा राजा ज्योतिबा
स्टार प्रवाह वाहिनीने अनेकोत्तम मालिका आपल्यापर्यंत पोचवल्या आहेत. आनंदाची गोष्ट ही की नुकताच ‘दक्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेच्या चित्रीकरणाला कोल्हापूर चित्रनगरीत प्रारंभ झाला.
स्टार प्रवाह वाहिनी आणि कोठारे व्हिजन यांनी हे आव्हान पेललं आहे.
आपल्या महाराष्ट्रात अनेक तीर्थक्षेत्रे आहेत आणि कोल्हापूरचा ज्योतिबा हे त्यापैकी एक आहे. निर्माते महेश कोठारे यांच्या मनात ज्योतिबा या दैवतावर आधारित मालिका करावी हा विषय अनेक वर्षे मनात होता. ते म्हणतात,”या मालिकेसाठी कोल्हापुरात भव्य सेट उभारण्यात आला आहे आणि यासाठी संपूर्ण टीम खूप मेहनत घेत आहे. ज्योतिबाचा महाल, महालक्ष्मीचा महाल, गाव, आश्रम, क्रोमा फ्लोअर तयार केला जात आहे.”
दैवतांबद्दल मालिका करताना खूप अभ्यास आणि संशोधन करावे लागते. डॉक्टर विठ्ठल बापूजी ठोंबरे हे या मालिकेचे तज्ज्ञ सल्लागार आहेत. मालिकेच्या भव्यतेसंदर्भात स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले,”भाविक आवर्जून ही मालिका बघतील आणि त्यांना आपल्या लाडक्या ज्योतिबा या दैवताचा महिमा या मालिकेच्या रूपाने पाहता येईल.”
या मालिकेच्या निमित्ताने कोल्हापूर परिसरातल्या अनेक कलावंतांना, तंत्रज्ञांना करिअरची संधी उपलब्ध झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव सांगतात, ‘श्री ज्योतिबाचे माहात्म्य या मालिकेतून सर्वांसमोर येईल. देवस्थान समिती या मालिकेसाठी सहकार्य करेलच. मालिकेचे कलादिग्दर्शन संतोष फुटाणे यांचे आहे. त्यांची सर्व टीम खूप मेहनत घेत आहे. तसेच नीलिमा कोठारे आणि नीट खांडके यांच्या एन क्रिएशन्स तर्फे मालिकेसाठी पोशाख आणि दागिने तयार केले आहेत.
या मालिकेसाठी कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. मालिकेचं लेखन स्वामी बाळ यांचे असून अविनाश वाघमारे दिग्दर्शक आहेत. मालिकेतील कलाकारांची ओळख आपल्याला कालांतराने होईलच.