‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Dashavatar चित्रपटाने गाजवलं बॉक्स ऑफिस; दहा दिवसांत पार केला १५ कोटींचा टप्पा!
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या ‘दशावतार’ (Dashavatar) चित्रपटाने हॅट्रिक केली आहे… प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादासाह दशावतार चित्रपटाने महाराष्ट्रातच नाही तर जगभरात डंका वाजवला आहे… बऱ्याच महिन्यांनंतर मराठी चित्रपटाने १५ कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर पार केला आहे ही आनंदाची आणि कौतुकाची बाब आहे… कारण, हिंदी, साऊथ चित्रपटांच्या शर्यतीत स्वत:च असस्तित्व टिकवण्याचं काम मराठी मेकर्स नक्कीच करत आहेत… (Marathi movie 2025)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘दशावतार’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ६ लाख, दुसऱ्या दिवशी १.४ कोटी, तिसऱ्या दिवशी २.४ कोटी, चौथ्या दिवशी १.१ कोटी, पाचव्या दिवशी १.२५ कोटी, सहाव्या दिवशी १.३ कोटी, सातव्या दिवशी १.१५ कोटी, आठव्या दिवशी १ कोटी, नवव्या दिवशी २.६५ कोटी, दहाव्या दिवशी आत्तापर्यंत ३ कोटी कमवत एकूण १५.८५ कोटींची कमाई केली आहे… ‘जारण’ (Jaaran) चित्रपटानंतर ‘दशावतार’ चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे…(Dahsvatar box office collection)
================================
================================
सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ चित्रपटात दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शनी इंदलकर, भरत जाधव, महेश मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत…दरम्यान, येत्या काळात ‘सैराट’चा (Sairat movie) १०० कोटींचा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड कुठला मराठी चित्रपट मोडू शकेल का हे पाहणं महत्वाचं असणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi