प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Dashavatar ऑस्कर गाजवणार! मुख्य चित्रपटांच्या स्पर्धेत ‘या’ श्रेणीत पहिल्यांदाच मराठी चित्रपटाची झेप
सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ (Dashavatar Movie) या चित्रपटाने २०२५ हे वर्ष गाजवलं… बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करण्यापासून ते मल्याळममध्ये डब होणारा देखील हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला… आणि आता या चित्रपटाने आणखी एक यशस्वी मजल मारली असून ९८व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाची एन्ट्री झाली आहे…. चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी मराठी रसिक प्रेक्षकांना ‘दशावतार’ या चित्रपटाची यंदा ऑस्करवारी होणार असल्याची आनंदाची बातमी सांगितली आहे… विशेष म्हणजे अॅकॅडमी स्क्रिनिंग रुममध्ये दाखवला जाणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे… (Dashavatar Movie in Oscar 2026)
सुबोध खानोलकर (Subodh Khanolkar) यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत ‘दशावतार’ चित्रपटाच्या ऑस्कर निवडीबद्दल माहिती दिली आहे… सुबोधने चित्रपटाच्या निर्मात्यांना आलेल्या एका संदेशाचा स्क्रिनशॉट या पोस्टसह शेअर केला. ज्यात लिहिलं आहे की, ‘नमस्कार सुजय, अकॅडमी स्क्रीनिंग रुममध्ये आता दशावतार लाइव्ह असेल. धन्यवाद.’ (Marathi Movies 2025)

पुढे ही पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिलं आहे की, “कष्टांचं, प्रामाणिकपणाचं, मोठं स्वप्नं पाहण्याचं चिज होतंच… फक्त कामावर विश्वास हवा, खाली मान घालून कष्ट करत राहण्याची चिकाटी हवी, पडल्यावर पुन्हा उभं राहण्याची जिद्द हवी आणि विश्वास ठेवणाऱ्या माणसांची खंबीर साथ हवी! आज ‘दशावतार’ ऑस्करच्या म्हणजेच अकॅडमी अवॉर्ड्सच्या मुख्य स्पर्धेत (Main Open Film category – Contention List) निवडला गेल्याचा मेल आला आणि गेली अनेक वर्ष आम्ही सगळ्यांनी जी मेहनत घेतली त्याची दखल घेतली गेल्याचं समाधान मिळालं. हे समाधान फक्त ‘दशावतार’ निवडला गेलाय म्हणून नाहीये, तर आपला मराठी चित्रपट जागतिक स्तरावर तोडीस तोड उभा राहू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय म्हणून आहे” (Entertainment News)
पुढे त्यांनी असं देखील लिहिलं आहे की, “मुख्य स्पर्धेच्या कॅटेगिरीत निवडला गेलेला ‘दशावतार’ हा बहुदा पहिलाच मराठी चित्रपट आहे. हजारो चित्रपटातून जे 150+ चित्रपट निवडले गेलेत त्यातला हा एकमेव मराठी चित्रपट आहे. Academy Screening Room मध्ये दाखवला जाणारा पहिलाच मराठी चित्रपट आहे! जिंकणं हरणं नंतरची गोष्ट, पण मुख्य जागतिक प्रवाहात मराठी चित्रपटाची दखल घेतली जाणं हे प्रचंड अभिमानास्पद आहे! ही फक्त सुरवात आहे, आम्ही सातत्याने चांगलं काहितरी तयार करण्याचा आणि ते जगासमोर आणून मराठी ची मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहू! प्रेम आणि आशीर्वाद असू द्या!”
================================
हे देखील वाचा : Dashavatar ने रचला इतिहास; मल्याळम भाषेत रिलीज होणारा ठरला पहिला मराठी चित्रपट!
================================
दरम्यान, या चित्रपटात बाबूल मेस्त्री ही भूमिका ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांनी साकारली होती… जगभरात त्यांच्या या भूमिकेने डंका वाजवला असून बॉक्स ऑफिसवर जगभरात या चित्रपटाने २८.४७ कोटींची कमाई केली आहे… या चित्रपटात दिलीप प्रभावळकरांसोबत महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, रवी काळे, विजय केंकरे, सुनील तावडे, आरती वडगबाळकर अशा बऱ्याच कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत… (Dashavatar Movie Cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi