India’s Sons: दीपिका भारद्वाज यांचा पुरुषांचा जीवनसंघर्ष मांडणारा डॉक्यूमेंट्री सिनेमा अखेर ओटीटीवर प्रदर्शित
‘इंडियाज सन्स’ या सिनेमाची प्रेक्षक गेले कित्येक दिवस वाट पाहत होतो. अखेर दीपिका नारायण भारद्वाज, नीरज कुमार आणि शोनी कपूर यांचा डॉक्युमेंटरी चित्रपट ‘इंडियाज सन्स’ अखेर ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. काही स्त्रियांनी खोट्या प्रकरणात अडकवलेल्या पुरुषांचा जीवनसंघर्ष हा या डॉक्युमेंटरीचा विषय आहे. दीपिका ही सामाजिक कार्यकर्त्या असून निर्भया घटनेनंतर बदललेल्या कायद्यांच्या गैरवापरावर ती काम करत आहे. त्यांचे सोशल मीडिया पेज आजही अशा तक्रारींनी भरलेले आहे.(India’s Sons Documentary on Jio)
जिओ सिनेमावर प्रदर्शित झालेला ‘इंडियाज सन्स‘ हा माहितीपट दिग्दर्शक दीपिका नारायण भारद्वाज यांनी हा सिनेमा तसाच बनवला आहे जसा हुंड्याचा छळ कायद्याच्या कलम ४९८ अ च्या गैरवापरावर त्यांनी आपला शेवटचा चित्रपट ‘मारटियर्स ऑफ मॅरेज‘ बनवला होता. दीपिकाच्या म्हणण्यानुसार, देशात सध्या बलात्काराच्या कायद्याबाबतही असंच काहीसं घडत आहे. आणि हे नग्न सत्य त्यांच्या ‘इंडियाज सन्स‘ या माहितीपटातून उलगडले आहे.
एका मुलाखतीत बोलताना दीपिका म्हणाली, ‘महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली पुरुषांना टार्गेट करणं ही आजकाल फॅशन झाली आहे. कोणतीही स्त्री आता सूडाच्या भावनेने किंवा कोणत्याही षड्यंत्राखाली कोणत्याही पुरुषाचे नाव घेऊन करिअर, त्यांचे आयुष्य आणि कौटुंबिक जीवन दोन मिनिटांत उद्ध्वस्त करू शकते कारण तिला आता पुरावे देण्याची गरज नाही.'(India’s Sons Documentary on Jio)
=================================
=================================
विशेष म्हणजे दिल्लीच्या ‘निर्भया घटने’नंतर बलात्कार आणि महिला छळाबाबत कायदा झाल्यानंतर आता एका महिलेने केवळ आपले शोषण झाले असे म्हणणे पुरेसे आहे. ‘इंडियाज सन्स’ या डॉक्युमेंटरीचा ट्रिगर पॉईंट काय होता, असे विचारले असता दीपिका असे अनेक किस्से सांगते ज्यात खोट्या आरोपामुळे कुणाचे आयुष्य बरबाद झाले, कोणी आत्महत्या केली आहे किंवा कुणाला कायमचे बलात्कारी ठरवले गेले आणि हे प्रकरण न्यायालयात टिकले नाही. आता इंडियाज सन्स पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत.