
Deepika Padukone : “Oscars मध्ये भारतीय चित्रपटांना वगळण्याची ही पहिली वेळ नाही”
हिंदी चित्रपटटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone) सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताचं नाव उज्वल करत आहे. नुकतंच तिने ऑस्कर पुरस्कारांवर भाष्य केलं असून भारतीय चित्रपटांचा ऑस्करमध्ये वारंवार होणाऱ्या पराभावावर तिने नाराजी व्यक्त केली आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांच्या यादीत किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ (Laapata Ladies) हा चित्रपट भारताकडून अधिकृतरित्या पाठवण्यात आला होता. पण यंदाही पुन्हा भारत ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला. यावरुन दीपिकाने ऑस्करमध्ये चांगल्या “भारतीय चित्रपटाला वगळण्याची ही पहिली वेळ नाही”, असं म्हटलं आहे.
दीपिका पादूकोण (Deepika Padukone) हिने सोशल मिडीयावर एक व्हिडिओ पोस्ट करत ऑस्कर पुरस्कारांबद्दल आपलं प्रामाणिक मत मांडलं आहे. ती म्हणाली की, ‘ऑस्करच्या शर्यतीतून एका चांगल्या भारतीय चित्रपटाला वगळण्याची ही पहिलीच वेळ नाही. भारतीय चित्रपट आणि भारतीय प्रतिभेबरोबर हे वारंवार घडत आहे’. (Entertainment news)

पुढे ती म्हणाली की,“भारताला अनेकवेळा ऑस्करपासून (Oscar Awards) वंचित ठेवण्यात आले आहे. एक नाही तर अनेक चित्रपटांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. चित्रपट असोत किंवा प्रतिभा… अनेकदा दुर्लक्ष करण्यात आलं आहे. भारतावर अनेकवेळा अन्याय झाला आहे. पण मला आठवतंय की, जेव्हा मी प्रेक्षकांमध्ये होते आणि त्यांनी ‘आरआरआर’ (RRR) हे नाव जाहीर केलं तेव्हा मी भावनिक झाली होती. त्या चित्रपटाशी माझा भारतीय असण्याव्यतिरिक्त काहीही संबंध नव्हता. पण माझ्यासाठी (Deepika Padukone) तो खूप मोठा भावनिक क्षण होता”. (Bollywood update)
==============
हे देखील वाचा : KKHH : जावेद अख्तर यांनी शाहरुखच्या चित्रपटाची गाणी लिहण्यास का दिला होता नकार?
==============
दीपिका पादूकोणच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती मुलगी ‘दुआ’ (Dua) हिच्यासोबत आपलं आईपण छान एन्जॉय करत आहे. आई होण्यापूर्वी ती रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ (Singham again) आणि ‘कल्की २८९८ एडी’ (Kalki 2898 AD) मध्ये दिसली होती. आता लवकरच ती ‘कल्की २’ मध्ये दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ‘कल्की १’’ चित्रपटाच्यावेळीच दुसऱ्या भागाचे शुटींग बऱ्यापैकी पुर्ण करण्यात आलं होतं. त्यामुळे लवकरच दुसरा भागही येईल अशी आशा आहे. याव्यतिरिक्त ‘द इंटर्न’ या चित्रपटात दीपिका अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या सोबत दिसणार आहे. (Bollywood upcoming movies)