Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Neena Kulkarni यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

Jitendra Kumar सचिवजींचा Bhagwat चित्रपटात दिसणार रुद्रावतार!

मीनाक्षी शेषाद्रीचा पहिला सिनेमा Painter Babu आठवतो का?

Digpal Lanjekar : शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प ‘रणपति शिवराय’- स्वारी

२०२५ मधील टॉप १० बॉलिवूडच्या यादीत Kantara 1 ची ग्रॅण्ड

Kantara : A Legend Chapter 1 चित्रपटाने बॉलिवूडलाही टाकलं मागे!

सर रिचर्ड अ‍ॅटेनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटात Rohini Hattangadi यांना कस्तुरबाची

Kantara Chapter 1 : कांताराने पुन्हा राडा घातलाय !

Treesha Thosar ने वेधलं बॉलिवूडचं लक्ष; शाहरुख खानही झाला फॅन

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Dev anand : देव आनंद पाकिस्तानी क्रिकेटपटूला घेऊन हा चित्रपट बनवणार होता!

 Dev anand : देव आनंद पाकिस्तानी क्रिकेटपटूला घेऊन हा चित्रपट बनवणार होता!
बात पुरानी बडी सुहानी

Dev anand : देव आनंद पाकिस्तानी क्रिकेटपटूला घेऊन हा चित्रपट बनवणार होता!

by धनंजय कुलकर्णी 29/01/2025

अभिनेता देव आनंद (Dev anand) भूतकाळात कधी रमायचे नाहीत ते कायम आपल्या पुढच्या चित्रपटांच्या विचारात असयाचे. पहिला चित्रपट सेटवर असताना त्यांच्या डोक्यात दुसऱ्या चित्रपटांचा विचार चालू असायचा. ऐंशीच्या दशकाच्या मध्यानंतर त्यांनी ‘क्रिकेट’ या थीमवर एक चित्रपट बनवायचे ठरवले. या चित्रपटामध्ये एका माजी नामवंत क्रिकेटपटू आणि नवीन क्रिकेटपटू यांच्यातील एक सुप्त संघर्ष त्याला दाखवायचा होता. त्या काळात भारतात टीव्हीवर क्रिकेट सामने प्रेक्षकांना पाहायला मिळत असल्यामुळे क्रिकेटची हवा प्रचंड वाढली होती. देव आनंद यांनी हीच लोकप्रियता कॅश करून घ्यायचे ठरवले आणि स्क्रिप्ट लिहून टाकली. चित्रपटाला टायटल दिले ‘अव्वल नंबर’.

खरं तर त्या वेळेला देव आनंद (Dev anand) त्यांच्या होम प्रोडक्शन नवकेतनच्या ‘सच्चे का बोल बाला’ शूटिंग करत होते. पण डोक्यात मात्र ‘अव्वल नंबर’ या सिनेमाची मांडणी सुरु झाली होती. या सिनेमातील भूमिका कुणाला द्यावी याची चाचपणी सुरु झाली होती. या चित्रपटात सीनियर क्रिकेटपटूची भूमिका कुणी करावी याबद्दल त्याच्या डोक्यात विचार सुरू झाला. त्याच वेळेला पाकिस्तानचा क्रिकेटपटू इम्रान खान याने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. (अर्थात पाकिस्तानी राष्ट्रपती जनरल झिया उल हक यांच्या सांगण्यावरून त्यानी हा निर्णय मागे घेतला.) इम्रान खान त्या काळात मॉडेलिंग देखील करत होता आणि पाकिस्तानी मीडियामध्ये अशा बातम्या येत होत्या की इम्रान खान लवकरच क्रिकेट संन्यास घेऊन सक्रीय राजकारणात सामील होणार आहे. (Untold stories)

देव आनंद (Dev anand)यांनी ही बातमी वाचल्यानंतर त्यांना वाटले आपल्या ‘अव्वल नंबर’ चित्रपटातील सीनियर क्रिकेटपटूची भूमिके करीता इम्रान खानला एकदम फिट्ट आहे. त्या पद्धतीने त्यांनी लंडनच्या इम्रान खानच्या घरी फोन केला. परंतु फोन बंद होता. देव आनंदने आंसरिंग मशीनमध्ये आपला मेसेज दिला. दोन तासानंतर इम्रान खानने जेव्हा तो मेसेज ऐकला; तेव्हा ताबडतोब देव आनंदला भारतात फोन केला आणि म्हणाला, ”देव साब मै आपकी क्या मदत कर सकता हूं?” तेव्हा देव आनंद म्हणाले, ”मेरे दिमाग में जो चल रहा है वो सबकुछ.” इम्रान खानला काही कळाले नाही. त्याने विचारले, ”मतलब?” देवने सांगितले, ”मी एक चित्रपट बनवत आहे. ज्यामध्ये एका सीनियर क्रिकेटपटूची भूमिका मी तुला ऑफर करत आहे. ही भूमिका तू करावीस अशी माझी इच्छा आहे.”

त्यावर इम्रान खान म्हणाला, ”देव साब, तुमने मुझे क्लीन बोल्ड कर दिया. लेकिन मुझे लगता नही मे तीन घंटे तक ॲक्टिंग कर सकूंगा. ॲक्टिंग मेरे बस की नही. मॉडेलिंग में सिर्फ दो तीन मिनिट एक्टिंग करनी पडती है. तीन घंटे ॲक्टिंग करना मुझे पॉसिबल नही.” त्यावर देव आनंद (Dev anand) यांचे म्हणणे असे होते,”इम्रान खान, तुम अभी कुछ फैसला मत करो. मै खुद आकर आपको स्क्रिप्ट सुनाऊंगा. उसके बाद आप हा या ना का फैसला लीजिए.” त्यावर इमरान खानने विचारले, ”आप लंडन कब आ रहे हो?” देव आनंद म्हणाले, ”नेक्स्ट फ्लाईट से लंडन आ रहा हूं” आणि खरोखरच पुढच्या दोन तासानंतर देव आनंद मुंबईहून लंडन जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बसले! (Entertainment mix masala)

वेस्ट एंडच्या पोर्टमन हॉटेलमध्ये उतरल्यानंतर त्यांनी ताबडतोब तिथून इम्रान खानला फोन केला. इम्रानला खूप आश्चर्य वाटले! तो म्हणाला, ”अरे कुछ घंटे पहले मैने आपसे बात कि थी उस वक्त आप हिंदुस्तान में थे और आप लंडन कैसे पोहोच गये?” देव आनंद (Dev anand) हसत हसत म्हणाले, ”मेरे काम करने का तरीका ही ऐसा है!” इम्रान खान म्हणाला, “देव साब आपने मुझे फिरसे क्लीन बोल्ड कर दिया!” नंतर देव आनंद म्हणाले, ”इम्रान, क्या आज रात का डिनर आप मेरे साथ कर सकोगे?” त्यावर इम्रान म्हणाला, ”जरूर. लेकिन इसके लिये आपको मेरे अपार्टमेंट आना पडेगा. मेरे घर खाना खायेंगे.”  

त्या रात्री देव आनंद (Dev anand) इम्रान खान यांच्या घरी गेले तिथे जेवताना देवने इम्रान खानला संपूर्ण सिनेमाची स्क्रिप्ट ऐकवली पण तरीही इम्रान खान फारसे कन्व्हिन्स झाले नाही. ते म्हणाले, ”खरंतर मला पाकिस्तानचे राष्ट्रपती झिया उल हक यांनी कल्चरल मिनिस्ट्री सांभाळायला सांगितले आहे तसेच पाकिस्तानी प्रेक्षक मला इतक्यात रिटायरमेंट घेऊ नका असे सांगत आहेत. त्यामुळे मी द्विधा मनस्थितीत आहे.” देव आनंद म्हणाले, ”ते ठीक आहे. पण आपला चित्रपट फक्त चार महिन्यात तयार होणार आहे. तेवढा वेळ तुम्ही मला द्या.”

इम्रान खान म्हणाला, ”मी विचार करून सांगतो.” देव आनंदने स्क्रिप्ट त्याच्याकडेच ठेवले आणि त्यांनी सांगितले, ”रात्री स्क्रिप्ट पुन्हा एकदा वाचा आणि निर्णय घ्या. तुमचा जो काही निर्णय असेल त्याचा मी आदरच करेन.” दुसऱ्या दिवशी देव आनंद यांना वेस्ट एंडच्या पोर्टमन हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये एक लिफाफा मिळाला त्यात ‘अव्वल नंबर’ ची स्क्रिप्ट होती आणि त्यासोबत इम्रान खानचे एपोलॉजी लेटर देखील होते. त्यात इमरानने लिहिले होते, ”देव साहेब, तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मनापासून आभार. पण मी स्वतः सिनेमाबाबत तेवढा कॉन्फिडंट नाही. कृपया मला माफ करा.” देव आनंदने इम्रानला फोन करून त्याच्या निर्णयाचे स्वागत केले आणि तडक मुंबईला रवाना झाले. इम्रान आणि देव दोघेही प्रोफेशनल आणि sophisticated होते.

===============

हे देखील वाचा : Amol Palekar : अभिनेता अमोल पालेकर ‘यांच्या’विरुध्द कोर्टात का गेले होते?

===============

आता ही भूमिका कोणी करायची हा परत विचार सुरू झाला आणि ही भूमिका शेवटी देव आनंद (Dev anand) यांनी स्वतःच केली. तरुण क्रिकेटरच्या भूमिकेमध्ये आमिर खान यांना घेतले. आदित्य पंचोली याची देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका होती. या चित्रपटाला बनायला दोन वर्षे लागली. १९९० साली हा चित्रपट तयार झाला. या चित्रपटाच्या प्रीमियरल त्या काळातील सर्व आवर्जून बोलावले होते. चित्रपटाला मात्र फारसे यश मिळाले नाही. पण देवानंदचे सिनेमाबाबतचे पॅशन आणि इम्रान खानला चित्रपटात घेण्याबाबतचा आग्रह याची त्या काळात मोठी चर्चा झाली होती.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress awwal number Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Dev Anand Entertainment Featured imran khan
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.