Raj Kapoor : वर्तमानपत्रातील एका छोट्या बातमीवरून बनवला हा भव्य

Dhamaal 4 : ८५ दिवस अॅक्शन सीनचं शुट करत ‘धमाल’ उडवून देणार!
हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या सीक्वेलसची लाट आली आहे. २००७ साली आलेल्या ‘धमाल’ चित्रपटाने यशस्वीरित्या याच चित्रपटाचे तीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आणले होते. आता लवकरच धमाल फ्रॅंचायझीमधील चौथा भाग भेटीला येणार आहे. आता ‘धमाल ४’ (Dhamaal 4) म्हटलं की चौपट धमाका होणारच. या चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. आणि आता पुन्हा एकदा सगळे मित्र नव्या खजिनाच्या शोधात धमाल घडवून आणणार आहेत. (Bollywood masala)
‘धमाल ४’ चित्रपटाबद्दल मिळालेल्या माहितीनुसार,या चित्रपटाचं शुटींग २१ मार्च २०२५ पासून सुरु होणार आहे. मुळ चित्रिकरण सुरु करण्यापूर्वी चित्रपटाच्या सीन्सची तालीम होणार आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्रातील माळशेज घाटामध्ये ‘धमाल ४’ चित्रपटाचं शुटींग होणार आहे. या चित्रपटात यावेळी संजय दत्त नसणार आहे; पण प्रेक्षकांच्या मनोरंजनाची जबाबदारी इतर कलाकारांनी घेतली असून यात अजय देवगण, अर्शद वारसी, जावेद जाफ्री हसवण्यासाठी सज्ज जावे आहेत. (Dhamaal 4 upcoming movie)

आणखी एक महत्वाची बाब म्हणजे ‘धमाल ४’ (Dhamaal 4) चित्रपटात अर्शद वारसी (Arshad Warsi) सोबत संजीदा शेख आणि रितेश देशमुखसोबत (Ritesh Deshmukh) अंजली आनंद या अभिनेत्री दिसणार आहेत. धमाल चित्रपटाच्या प्रत्येक भागात कलाकार पैसे शोधताना दिसले होते. पण चौथ्या भागात पैश्यांऐवजी हिरे, मोती असा खजिना ते शोधणार आहेत. (Entertainment update)
===========
हे देखील वाचा : Chhaava : चित्रपटातील एका गाण्यात दिसले प्रभू श्रीराम आणि मारुतीराय
===========
‘धमाल ४’ (Dhamaal 4) मध्येच अॅक्शन आणि विनोदाचा ब्लास्ट पाहायला मिळणार आहेत. यावेळी ‘धमाल ४’ मध्ये कलाकार पर्वतांवर अॅक्शन करताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे चित्रपटाच्या निर्मात्यांनी या अॅक्शन सीन्सच्या चित्रीकरणासाठी ८५ दिवसांचे विशेष वेळापत्रक आखले आहे. दरम्यान, ‘धमाल ४’ चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्रा कुमार करणार असून अद्याप प्रदर्शनाची तारीख गुलदस्त्यात ठेवली आहे. (Bollywood movies)