आई–मुलींच्या नात्याच्या नाजूक छटा उलगडणारा Tighi चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Dhanush आणि ऐश्वर्या रजनीकांतची ‘अशी’ होती लव्हस्टोरी!
सुपरस्टार रजनीकांत यांचा एक्स जावई धनुष (Dhanush) त्याच्या आगामी ‘तेरे इश्क में’ (Tere Ishq Mein) चित्रपटामुळे खास चर्चेत आहे… २०१३ मध्ये रिलीज झालेल्या ‘रांझना’ (Raanjhanaa) चित्रपटाच्या झोनमधला हा चित्रपट असून यात त्याच्यासोबत क्रिती सेनॉन दिसणार आहे… प्रेमाची एक वेगळीच परिभाषा यात दिग्दर्शक आनंद एल.राय (Anand L Rai) यांनी मांडली असून धनुषचा ‘तेरे इश्क में’ चित्रपटातील शंकर या पात्राचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहण्यासाठी आता चाहते उत्सुक आहेत…. जितकी त्याच्या प्रत्येक चित्रपटाची चर्चा रंगली तितकीच त्याच्या घटस्फोटाचीही रंगली… आज जाणून घेऊयात धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांची लव्हस्टोरी होती तरी कशी? (Entertainment News)

तर, ऐश्वर्या रजनीकांत (Aishwerya Rajinikanth) आणि धनुष दोघेही तमिळ चित्रपटसृष्टीतील दिग्गज कुटुंबातून येतात… ऐश्वर्या तर सुपरस्टार रजनीकांत यांची कन्या आहे तर धनुष हा निर्माते-दिग्दर्शक कस्तुरीराजा यांचा लेक… या दोघांची पहिली भेट धनुषच्या Kadal Kondaen चित्रपटाच्या रिलीजवेळी झाली… हळूहळू दोघं एकमेकांचे चांगले मित्र झाले… भेटीगाठी वाढल्या आणि दोघांच्याही घरच्यांना धनुष आणि ऐश्वर्या एकमेकांसाठी परफेक्ट आहेत असं वाटू लागलं… लग्नाची बोलणी सुरु झाली आणि १८ नोव्हेंबर २००४ ला दोघांचं लग्न थाटामाटात झालं… लग्नानंतर काही काळ सारं आलबेल असताना अचानक २०२४ मध्ये सोशल मिडियावर धनुष आणि ऐश्वर्या यांनी घटस्फोट घेतल्याचं जाहिरच केलं आणि चाहते अवाक् झाले… दोघांच्या संमत्तीने त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि १८ वर्षांचा त्यांचा प्रवास २०२४ मध्ये कायमचा संपला… (Dhanush Divorced)
================================
हे देखील वाचा : Marathi Movies : मराठी चित्रपटसृष्टीचं नेमकं अडतंय कुठे?
================================
वडिल निर्माते आणि दिग्दर्शक असूनही चित्रपटांमध्ये करिअर न करता धनुषला मात्र इंजिनियर व्हावं की शेफ हे कळतं नव्हतं… अखेर धनुषच्या भावाने त्याला चित्रपटात आणलंच… तमिळमध्ये आपलं बस्तान मांडल्यानंतर ‘रांझना’ चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली… पदार्पणातच दिग्दर्शक आनंद एल.राय यांना मला हिंदी बोलता येत नसल्याचं त्याने सांगितलं होतं… दिग्दर्शनकांनी तमिळमध्ये डायलॉग बोल नंतर हिंदीत डब करु असं तेव्हा धनुषला सांगितलं.. पण दुसऱ्या दिवशी धनुषने हिंदी डायलॉग्स तमिळमध्ये लिहिले आणि तो शुटींगच्या वेळी हिंदीतच स्वत:चे डायलॉग्स बोलला… त्यामुळे तुम्ही जर का नीट ‘रांझना’ पुन्हा पाहिला तर धनुषच्या जायलॉग डिलव्हरीमध्ये तुम्हाला वेगळेपणा नक्कीच जाणवेल…

अभिनयात आपला जम बसवणाऱ्या धनुषचं संगीत क्षेत्राशी देखील खास नातं आहे… ‘कोलावेरी डी’ हे गाणं तर धनुषच्या आयुष्यातील बेस्ट आणि सुपरहिट गाणं आहे… याच गाण्यापासून त्याने गाणं लिहिण्याचा प्रवास देखील सुरु केला होता हे फारसं कुणाला माहित नसेल… आत्तापर्यंत धनुषने ३० पेक्षा जास्त गाणी लिहिली आहेत आणि बऱ्याच संगीतकारांसाठी तो गायला देखील आहे… अभिनेता, दिग्दर्शक, गायक, गीतकार अशा सगळ्याच क्वालिटी धनुषच्या अंगी आहेत… आता त्याचा ‘तेरे इश्क में’ चित्रपटात त्याची वेगळी कोणती झलक दिसणार हे पाहायला सगळेच आतुर आहेत… क्रिती सेनॉन (Kriti Sanon) आणि धनुषची प्रमुख भूमिका असणारा हा चि६पट २८ नोव्हेंबर २०२५ रोजी देशभरात रिलीज होणार आहे…. (Dhanush Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi