Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Bigg Boss Marathi 6 घरात होणार होणार शॉकिंग एलिमिनेशन; ‘या’

“सलग ५ दिवस सुरूच होतं आणि सहाव्या दिवशी मी रुग्णालयात

Lata Mangeshkar आणि साहिर लुधियानवी यांच्यात का मतभेद झाले होते?

Nana Patekar आता ओटीटी गाजवणार; ‘संकल्प’ वेब सीरीज लवकरच येणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

मित्राला दिलेलं वचन पाळण्यासाठी Dharmendra यांनी ‘या’ मराठी चित्रपटात केलं होतं काम

 मित्राला दिलेलं वचन पाळण्यासाठी Dharmendra यांनी ‘या’ मराठी चित्रपटात केलं होतं काम
मिक्स मसाला

मित्राला दिलेलं वचन पाळण्यासाठी Dharmendra यांनी ‘या’ मराठी चित्रपटात केलं होतं काम

by रसिका शिंदे-पॉल 25/11/2025

भारतीय चित्रपटसृष्टीतील He-Man धर्मेंद्र यांनी आजवर ३०० पेक्षा अधिक चित्रपटात विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं… इतकंच नाही तर ८९व्या वर्षी त्यांनी अभिनेता म्हणून ‘इक्कीस’ हा शेवटचा चित्रपटही त्यांनी केला… शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहिन हे बऱ्याच मुलाखतीत धर्मेंद्रंनी म्हटलेलं वाक्य पुर्ण केलंच… धर्मेंद्र (He-Man Of Bollywood Dharmendra) यांनी कधीच आपलं स्टारडम मिरवलं नाही… ८०-९०च्या दशकात एकीकडे हिंदीत यशाच्या शिखरावर असलेल्या धर्मेंद्र यांनी मित्राला दिलेलं वचन पाळण्यासाठी एका मराठी चित्रपटात काम केलं होतं… कोणता होता तो चित्रपट? चला जाणून घेऊयात…(Dharmendra in Marathi Movie)

धर्मेंद्र यांनी आजवर हिंदीसह पंजाबी, बंगाली आणि एका मराठी चित्रपटात काम केलं.. त्यांच्या सिनेकारकिर्दितील एक खास किस्सा ज्येष्ठ सिनेसमीक्षक दिलीप ठाकूर यांनी एका मुलाखतीत सांगितला होता… ठाकूर यांनी म्हटलं होतं की, “मुंबईतील चांदिवली स्टुडिओचे मालक हेमंत कदम आणि धर्मेंद्र यांची खास मैत्री होती. तेव्हा केवळ मैत्रीसाठी धर्मेंद्र यांनी हेमंत कदम यांच्या ‘हिचं काय चुकलं’ या मराठी चित्रपटातील एका गाण्यासाठी शूटिंग केलं होतं. ‘घेऊन टांगा सर्जा निघाला, दूर धन्याच गाव… अरे तू धाव’ असं या गाण्याचं नाव होतं आणि या गाण्यात धर्मेंद्र यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhle) देखील दिसले होते”… (Marathi Movies)

१९८९ मध्ये अरविंद लाड दिग्दर्शित ‘हिचं काय चुकलं’ हा चित्रपट रिलीज झाला होता.. या चित्रपटात विक्रम गोखले प्रमुख भूमिकेत होते… तर त्यांच्यासोबत विजय कदम, शोभा खोटे, रंजना आणि रवी पटवर्धन अशी मातब्बर कलाकार मंडळी देखील चित्रपटाचा भाग होते…  हॅन्डसम आणि उत्कृष्ट अभिनय सादरीकरण या दोघांचा मिलाफ असणाऱ्या धर्मेंद्र यांच्यामागे तरुण-तरुणी अक्षरश: वेडे होते… १९८७ मध्ये ७ चित्रपट बॅक टू बॅक हिट देणारे द ग्रेट धर्मेंद्र कायमच त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतून आपल्या स्मरणात राहतील….  शिवाय, धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट ‘इक्कीस’ (Ikkis Movie) २५ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज होणार असून तो थिएटरमध्ये पाहण्याची त्यांची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली…. (Dharmendra Death News)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: arvind lad Bollywood Bollywood News Dharmendra dharmendra death dharmendra marathi movie he-man of bollywood hicha kay chukala marathi movie vikram gokhle
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.