Suraj Chavan : ‘झापुक झुपूक’ चित्रपटात सूर्यासह कलाकारांची मांदियाळी!

धर्मेंद्र आणि राखी यांचा ‘Jeevan Mrityu’
सुमधुर संगीतात रंगलेली प्रेमकथा असं ज्या चित्रपटाचं वर्णन करता येईल असा राजश्रीचा ‘जीवन मृत्यू‘ ६ जानेवारी १९७० (Jeevan Mrityu) रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा चित्रपट सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण होता. एकतर राजश्रीचा तो पहिला रंगीत चित्रपट होता. अभिनेत्री राखीचा हा पहिला चित्रपट होता. धर्मेंद्रने या एकमेव राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटात भूमिका केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन सत्येन बोस यांनी केले होते. साठच्या दशकात धर्मेंद्रने अनेक हळूवार रोमॅंटीक भूमिका केल्या होत्या. त्यातली कदाचित ही अखेरची भूमिका असावी. वस्तुत: १९६७ साली आलेल्या ‘जीबन मृत्यू‘ या हिरेन नाग दिग्दर्शित बंगाली सिनेमाचा हा रीमेक होता. १८४४ साली लिहिलेल्या Alexander Dumas यांच्या ‘The count of monte cristo‘ कादंबरीवर आधारीत कथानक होते.

चित्रपटाचे कथानक साधे असले तरी नाट्यमय होते. अशोक टंडन (धर्मेंद्र) एका बँकेत मनेजर असतो व आपल्या आई (लीला चिटणीस) सोबत रहात असतो. प्रामाणिक, सचोटी आणि आदर्श जीवन मूल्यांचा तो आदर करणारा असतो. दीपा (राखी) त्याची महाविद्यालायातील मैत्रीण. दोघांचे प्रेम असते. लवकरच ते लग्न करणार असतात पण एक अशी घटना घडते की त्यांच्या साऱ्या स्वप्नांचा चक्का चूर होतो.
अशोकला बँकेतील १० लाख रुपयाच्या अपहारासाठी अटक होवून सात वर्षाची शिक्षा होते. आपल्या आईची काळजी घेण्याचे वचन तो दीपाकडून घेतो. जेव्हा तो कारावासातून बाहेर येतो तेव्हा सारेच चित्र बदलले असते. त्याची आई अपघातात मृत्यू पावल्याचे कळते तर प्रेयसी ते शहर सोडून गेल्याचे कळते. हताश, विमनस्क अवस्थेत तो फिरत असताना त्याला त्याच्या बँकेतील एक कर्मचारी समीर (रूपेश कुमार) भेटतो. तो त्याला अडकवण्याचे षडयंत्र कुणी रचले हे सांगतो. त्याच्याच बँकेतील अजित, कन्हैयालाल आणि कृष्ण धवन या तिघांनी मिळून त्याला अडकवून स्वत: पैशाचा अपहार केलेला असतो. अशोकला धक्का बसतो. (Jeevan Mrityu)

वकील रमेश देव ही या कृष्ण कृत्यात सामील असतो. अशोक अत्यंत खचलेल्या मनस्थितीत रेल्वेने प्रवास करत असताना त्याचे पाकीट एक चोर चोरतो. लोक त्या चोराला पकडायला धावत्तात तेव्हा तो चोर दुसऱ्या रेल्वेला धडकून मरतो . त्याच्या खिशातील अशोकच्या नावाचे पाकीट बघून लोक अशोकचाच मृत्यू झाल्याचे समजतात. त्याच रात्री आणखी एक नाट्य घडते. दोन चोर एक ब्रीफकेस जंगलात लपवून ठेवल्याचे तो पाहतो. ती ब्रीफकेस तो त्याच्या ओरीजनल मालकाकडे पोचवतो. हा मालक राजा रणवीर सिंग (Bipin Gupta) अशोकला स्वत: कडे त्याचा प्रामाणिकपणा पाहून ठेवून घेतो. अशोकची कहानी ऐकून तो त्या तीन बदमाशाना अद्दल घडविण्यासाठी सर्व मदत करण्याचे आश्वासन देतो. जगाच्या दृष्टीने अशोक टंडन मेलेलाच असतो.
===============
हे देखील वाचा : Saraswati Rane : जब दिलको सताये गम तू छेड सखी सरगम
===============
आता तो आपला हुलीया बदलून नवीन नावाने (विक्रम सिंग) जगापुढे येतो. त्याचा हा नवा जन्म स्वत: वरील अन्याय कलंक दूर करण्यासाठी झालेला असतो. त्याचा जुना मित्र प्रेम प्रकाश (राजेंद्रनाथ) च्या मदतीने तो पुन्हा महानगरीत येतो. अशोक त्या पाताळ यंत्री गुन्हेगारांना अद्दल घडवतो का? दीपाची त्याची भेट कशी कुठे होते? या प्रश्नाची उत्तरे अर्थातच सकारात्मक आहेत. (Untold stories)
अभिनयाच्या बाबतीत बोलायचे तर धर्मेंद्रने हा सिनेमा पूर्णपणे तोलला आहे. राखीला तशी भूमिका तुलनेने छोटीच आहे. पण त्यांची केमिस्ट्री चांगली जमली. विशेषत: ‘झिलमील सितारोका सावन होगा‘ या अप्रतिम गीतात ते दोघेही कमालीचे फ्रेश दिसतात. खलनायकाच्या त्रिकूटातील अजित बाजी मारून जातो. गजानन जागीरदार, मुराद, रमेश देव यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका व्यवस्थित झाल्या. राजेंद्रनाथ हा विनोदवीर आटोक्यात राहील इतकाच त्याचा वापर आहे. धरम राखीने पुढे काही चित्रपटात भूमिका एकत्र भूमिका केल्या पण लक्षात राहिल्या दोनच एक ‘जीवन मृत्यू’ (Jeevan Mrityu) आणि दुसरी ‘ब्लॅक मेल’ मधील! यात फक्त दोनच गाणी होती आनंद बक्षी यांच्या गीताला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत होते.