Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

दिलीप कुमारने दिलेला स्वेटर धर्मेंद्रने आजही ठेवलाय जपून…
साठ आणि सत्तरच्या दशकातील ही मॅन धर्मेंद्र याने एका रेडिओ कार्यक्रमात दिलीप कुमार सोबत झालेल्या पहिल्या भेटीचा एक दिलचस्प किस्सा सांगितला होता. धर्मेंद्र सुरुवातीपासूनच दिलीप कुमारचे प्रचंड मोठे फॅन होते. ते लहान असताना जेव्हा फगवाड्याला राहत होते तेव्हा दिलीप कुमारचा एकही चित्रपट ते चुकवत नसे. दिलीपच्या सिनेमाचे ते वारंवार पारायण करत असत. आपल्या पुस्तकांमध्ये देखील ते दिलीप कुमारचे फोटो लपवून ठेवत असत आणि आपल्या आई-वडिलांपासून लपवून ते फोटो पाहत असत. आयुष्यात कधीतरी आपल्या या दैवताला भेटावे असे धर्मेंद्रला (Dharmendra) कायम वाटत असे. दिलीप कुमार प्रमाणेच आपण देखील चित्रपटात जाऊन अभिनय करावा हे देखील त्यांच्या उराशी बाळगलेलं एक स्वप्न होते. काळ पुढे गेला आणि एक दिवस दिलीप कुमारला भेटण्यासाठी आणि सिनेमात काम करण्यासाठी धर्मेंद्र (Dharmendra) चक्क घरातून फ्रंटीयर मेलने पळून मुंबईला आले आणि त्यांचा मायानगरीत स्ट्रगल सुरू झाला. त्यांना सिनेमात कामं मिळू लागली पण आपल्या दैवताची भेट काही होत नव्हती. धर्मेंद्र (Dharmendra) सिनेमात काम करू लागले तरी त्यांची कायम नजर दिलीप कुमारला शोधत असायची. पण सरळ जाऊन भेटायची हिम्मत होत नसे.

एकदा बिमल रॉय यांच्या ‘बंदिनी’ या चित्रपटाच्या सेटवर दिलीपकुमार आले. धर्मेंद्रला (Dharmendra) प्रचंड आनंद झाला. आज आपली नक्की दिलीप कुमार सोबत भेट होईल या खुशीत ते होते. दिलीप कुमार लंच टाईममध्ये सर्व कलाकारांसोबत जेवण करण्यासाठी आले. पण धर्मेंद्रचे दुर्दैव! त्यांची कुणी ओळखच करून दिली नाही दिलीप कुमार शी. धर्मेंद्र (Dharmendra) भिडस्त लाजाळू. ते स्वत: पुढे गेलेच नाहीत! आपल्या पुढ्यात आपलं दैवत असून आपण त्याला भेटू शकलो नाही, ही सल त्यांच्या मनात राहिलीये. पण काही दिवसातच एक चांगला योग जुळून आला.
फिल्मफेअरच्या एका फोटोशूटसाठी धर्मेंद्रला (Dharmendra) बोलावण्यात आला. तिथे फोटोग्राफर एल व्ही राव यांनी धर्मेंद्रची ओळख दिलीप कुमारची बहिण सईदाशी करून दिली. तिला भेटल्यानंतर धर्मेंद्रने लगेच दिलीप कुमार बाबतचे आपले मत भरभरून सांगायला सुरुवात केली. सईदा देखील ते ऐकून खूप आनंद झाला. सिनेमातील एक उभरता कलाकार आपल्या भावाचा किती मोठा फॅन आहे हे तिला कळालं. या भेटीत धर्मेंद्रने (Dharmendra) आपली दिलीप कुमार सोबत एकदा भेट घडून दे असं सईदाकडे हट्टच धरला. तिच्या कडून आश्वासनच घेतलं. सईदा ने लगेच त्या आठवड्यात धर्मेंद्रला आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले.
धर्मेंद्रला (Dharmendra) त्या रात्री आकाश ठेंगण झालं. आपल्या दैवताशी आपली भेट होणार या धुंदीमध्ये त्याला रात्री झोप आली नाही. पुढचा प्रत्येक एक दिवस त्याला एक वर्षाचा वाटू लागला आणि एकदा तो भेटीचा दिवस उजाडला. त्या संध्याकाळी थोडं लवकरच दिलीप कुमार यांच्या घरी पोहोचला. सईदाने त्याचे स्वागत केले आणि दिलीप कुमार यांच्याकडे ती घेऊन दिली. दिलीप कुमारने देखील त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याच्याशी भरपूर गप्पा मारल्या. धर्मेंद्रच्या डोळ्यात अश्रू आले. आपल्या सिने दुनियेतील आयडॉल आपल्याशी बोलत आहे यावर त्याचा विश्वास बसत नव्हता.
======
हे देखील वाचा : अभिनेत्रीच्या ‘इगोस्टिक एटीट्यूड’ ने घडलं असं काही…
======
दिलीप कुमारने त्याला अभिनयाच्या भरपूर टिप्स दिल्या. इथले ‘तौर तरीके’ समजावून सांगितले. जाताना दिलीप कुमारने पॅरिस हून आणलेले एक स्वेटर धर्मेंद्रला भेट म्हणून दिले. धर्मेंद्रने ते स्वेटर आयुष्यभर सांभाळले. आजही धर्मेंद्रने (Dharmendra) ते स्वेटर मोठ्या प्रेमाने आपल्याजवळ जपून ठेवले आहे. धर्मेंद्रला दिलीप कुमारसोबत काम करण्याची खूप इच्छा होती पण हिंदीमध्ये मात्र हा योग जुळून आलाच नाही. खरंतर बी आर चोप्रा या दोघांना घेऊन ‘चंद्रगुप्त आणि चाणक्य’ या कथानकावर एक चित्रपट बनवणार होते पण हा चित्रपट काही बनला नाही. हिंदीत नाही पण बंगाली भाषेतील एका चित्रपटात या दोन महान कलाकारांनी एकत्र भूमिका केली आहे हा चित्रपट आहे ‘पारी’ जो साठच्या दशकाच्या अखेरीस आला होता.