Ashok Saraf : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने अशोक सराफ यांच्याशी अनेक

ghajini च्या मुख्य भूमिकेसाठी आमीर खानने सलमानचे नाव सुचवले होते ?
२५ डिसेंबर २००८ रोजी खिसमसच्या दिवशी आमिर खान (Aamir Khan) चा ‘गजनी’ (Ghajini) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अभूतपूर्व असे यश मिळवले होते. या सिनेमातील आमिरचा लुक खूप लोकप्रिय झाला होता. आमिर खानसाठी हा एक सर्वार्थाने वेगळा सिनेमा होता. कारण तोपर्यंत आमिर खान काहीतरी सोशल अँगल घेऊन चित्रपटात काम करत असे पण या चित्रपटात तसा कुठलाही सोशल अँगल नव्हता.

ही एक पर्सनल स्टोरी असलेली मूव्ही होती. या सिनेमाने भारतात १०० कोटी हून अधिक पैसे कमावले. आपल्या देशात १०० कोटी रुपये कमावणारा हा पहिला सिनेमा ठरला. गंमत म्हणजे हा चित्रपट आमिर खान आधी स्वीकारायला तयार नव्हता. त्याच्या दृष्टीने ही भूमिका सलमान खानची होती. त्यामुळे त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शक मुर्गादास यांना या भूमिकेसाठी सलमान खानचे नाव रेकमेंड केले होते. मग आमिर खान या सिनेमात कसा आला? खूप इंटरेस्टिंग अशी स्टोरी आहे.
‘गजनी’ (ghajini) हा चित्रपट खरंतर याच नावाच्या एका तामिळ सिनेमाचा रिमेक आहे. २००५ मूळ तमिळ सिनेमा प्रदर्शित झाला होता आणि लोकप्रिय झाला होता. या चित्रपटाचा हिंदीत रिमेक करण्याचे दिग्दर्शक मुर्गादास यांनी ठरवले आणि हे ठरवताना त्यांनी मनात आमिर खान हेच नाव निश्चित केले होते. त्या पद्धतीने ते आमिर खान यांना मूळ तमिळ व्हर्शन दाखवले. आमीरला सिनेमा आवडला. सिनेमातील twist and turns जबरा होते. (Untold stories)

दिग्दर्शक मुंबईत आमीरला भेटले. पण ती स्टोरी ऐकल्यानंतर आमिर खान म्हणाला, ”स्टोरी चांगली आहे. पण माझ्या ऐवजी ही भूमिका सलमान खानला जास्त सूट होईल. मी या भूमिकेत तेवढा कम्फर्टेबल वाटणार नाही.” पण दिग्दर्शकाने अमीर खानला या चित्रपटाचे मूळ तमिळ आवृत्ती पुन्हा पाहायला सांगितले. त्या पद्धतीने आमिर खानसाठी या मूळ तामिळ गजनीचा एक खास शो अरेंज करण्यात आला. मूळ तामिळ मधील हिरो सूर्याने देखील आमीरला हा सिनेमा करण्याचा आग्रह केला. हा (ghajini) चित्रपट पाहिल्यानंतर मात्र आमिर खानचे मत बदलले सिनेमाची कथानक जबरदस्त होते स्क्रीन प्ले अगदी बंदिस्त होता. चित्रपटाचा क्लायमॅक्स देखील प्रेक्षकांना खेळवून टाकणारा होता तरी एक ॲक्शन मुव्ह करायला तो मनातून कुठेतरी डायलेमामध्ये होता.
त्यावर चित्रपटाचे दिग्दर्शक मुर्गादास म्हणाले, ”सलमान खान हा ऑलरेडी ॲक्शन हिरो म्हणून प्रेक्षकांनी स्वीकारला आहे. त्यामुळे त्याला या भूमिकेत घेतल्यावर चित्रपट नक्कीच यशस्वी होईल पण एक आणखी एक ॲक्शन पट एवढी त्याची व्हॅल्यू राहील. पण तुम्ही जरा चित्रपट केला तर प्रेक्षकांना वेगळी ट्रीट मिळेल आणि तुम्ही या कॅरेक्टरसठी एकदम परफेक्ट आहात.” दिग्दर्शकाच्या कन्व्हिन्सिंग पॉवरमुळे आमिर खानने हा चित्रपट स्वीकारला. त्याने या भूमिकेचा प्रचंड अभ्यास केला या सिनेमाचे लोकेशन्स, या सिनेमाचे पार्श्व संगीत यावर आमिर खानने स्वतः खूप काम केले. (Bollywood takda)

या सिनेमाचा क्लायमॅक्स स्वतः आमिर खानने लिहिला होता. या चित्रपटात आमीर anterograde amnesia या व्याधीने त्रस्त असतो. हा प्रकार देखील एकदम नवीन होता. या सिनेमाचे जे टायटल ‘गजनी’ होते ते एका याच चित्रपटातील खलनायकाचे नाव होते. हे असं पहिल्यांदाच घडत होतं. चित्रपटाच्या लीड हिरोचे नाव न देता एका कॅरेक्टर ॲक्टर चे नाव चित्रपटाला दिले होते. तो कलाकार होता प्रदीप रावत.
============
हे देखील वाचा : Shammi kapoor: ‘या’ मुलींनी शम्मी कपूरचे फुटबॉल करीअर संपुष्टात आणले?
============
प्रदीप रावतने तमिळ गजनीमध्ये देखील भूमिका केली होती. त्याने पण आमिर खानला हा चित्रपट करण्यासाठी प्रोत्साहित केले होते. या सिनेमाचा क्लायमॅक्स हैदराबादमध्ये चित्रित केला होता. तर सिनेमाचे बाकी शूटिंग मुंबई, बेंगलोर, केप टाऊन, नामिबिया येथे केले होते. अवघ्या एक वर्षात हा चित्रपट बनला होता. हे संपूर्ण वर्षभर आमिर खानने या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली. जिममध्ये जाऊन त्याने आपल्या बॉडीमध्ये जबरदस्त डेव्हलपमेंट केली. सिक्स पॅक हे या व्यक्तिरेखाच वैशिष्ट्य होतं त्यासाठी आमिर खानने जिवापाड मेहनत घेतली. या चित्रपटातील आमिर खानच्या भूमिकेचे सर्वत्र प्रचंड कौतुक झाले. आमिर खानला देखील आपला हा चित्रपट इतका यशस्वी होईल असे वाटले नव्हते.