‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
Shreyas Talpade ला कोविड लसीमुळे आला होता हृदयविकाराचा झटका? अभिनेत्याने स्वतः दिले उत्तर
बॉलिवुड तसेच मराठी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे याला गेल्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला होता. एक दिवशी श्रेयस चित्रपटाचे चित्रीकरण आटोपून घरी परतला आणि घाईघाईत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुमारे 6 दिवसांनंतर तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊन घरी परतला होता. दरम्यान आता कोरोना काळात वापरण्यात आलेल्या कोविशिल्ड लशीमुळे रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात आणि आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे लोक सर्व प्रकारे त्रस्त आहेत, अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. अशातच आता यासंदर्भात सुप्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे वर प्रतिक्रिया येत आहेत.(Shreyas Talpade On Covishield Vaccine)
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र, आता या अभिनेत्याची तब्येत बरी असून तो पुन्हा आपल्या कामावर परतला आहे. हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, अभिनेत्याने म्हटले आहे की, ‘मी धूम्रपान करत नाही. मी खरोखर दररोज मद्यपान ही करत नाही, मी केले तर महिन्यातून एकदा मद्यपान करतो. मी तंबाखू ही खात नाही. होय, माझे कोलेस्टेरॉल थोडे वाढले होते, जे मला आजकाल नॉर्मल असल्याचे सांगण्यात आले आहे. मला मधुमेह नाही, रक्तदाब नाही, तर मग त्याचे कारण काय असू शकते?
यावर अभिनेत्याने म्हटले आहे की, ‘हा सिद्धांत मी नाकारू शकत नाही. कोव्हिड-19 लस घेतल्यानंतरच मला थोडा थकवा जाणवू लागला आहे. त्यात काही तरी तथ्य असावे. हे कोव्हिडमुळे असू शकते, किंवा लसीमुळे असू शकते, मला याबद्दल पूर्णपणे माहित नाही, परंतु काहीतरी आहे हे नक्की. खरं सांगायचं तर आपण आपल्या शरीरात काय साठवून ठेवतो हे आपल्याला कळत नाही. जे लोक वर्कआऊट करत आहेत किंवा खेळत आहेत आणि काहीतरी घडत आहे किंवा एखादी व्यक्ती स्वतःची काळजी घेत आहे तरी ही त्याला काही होत आहे आणि याबद्दल आपण हल्ली ऐकत आहोत, की 30 ते 40 वयोगटातील लोक आहेत आणि त्यांच्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचा उल्लेख करताना ऐकायला मिळत तसेच अनेकांचा अचानक मृत्यू झाला आहे. असे ही श्रेयस म्हणाला.
================================
=================================
सध्या कोविड -19 लसीबद्दल चुकीची माहिती मोठ्या प्रमाणात फिरत आहेत, ज्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आणि संकोच पसरला आहे. कोविड-19 लस डीएनएमध्ये बदल करू शकते, असा खोटा दावा केला जात आहे. तथापि, हा दावा पूर्णपणे निराधार आहे आणि वैज्ञानिक पुराव्यांचा अभाव आहे.