‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

५० वर्षांपूर्वी Sholay चित्रपटातील जय-वीरुच्या जोडीचं मानधन माहितेय का?
भारतीय चित्रपटसृष्टीचा आयकॉनिक चित्रपट ‘शोले’ (Sholay) रिलीज होऊन ५० वर्ष पूर्ण झाली… अर्ध शतक पूर्ण झालं असलं तरी आजही जय-वीरुच्या मैत्रीचे किस्से आणि त्यांचं उदाहरण कायमच दिलं जातं… शिवाय बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना हा डायलॉग दिवसागणिक अधिकच लोकप्रिय होत चालला आहे यात शंकाच नाही… आजच्या घडीला एखादा चित्रपट हिट झाला की बॉक्स ऑफिस कलेक्शनसोबतच कलाकारांनी किती मानधन घेतलं त्याची चर्चा अधिक होते… बऱ्याचदा चित्रपटाचं बजेट तुटपुंज असलं तरीही कलाकार तगडं मानधन घेतात.. मात्र, ५० वर्षांपूर्वी ३ कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या ‘शोले’ चित्रपटातील कलाकारांनी किती मानधन घेतलं होतं तुम्हाला माहित आहे का? चला तर जाणून घेऊयात…(Bollywood News)

रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ चित्रपटात जयची भूमिका साकारणाऱ्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना १,२५,००० इतकं मानधन दिलं होतं तर वीरुची भूमिका साकारणाऱ्या धर्मेंद्र (Dharmendra) यांना १,५०,००० इतकं मानधन होतं… गब्बर सिंगची भूमिका अमजद खान (Amjed Khan) यांनी फार उत्कृष्ट सादर केली होती आणि त्यांना या चित्रपटासाठी ५०,००० मानधन होतं. चित्रपटातील दोन प्रमुख अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) आणि हेमा मालिनी (Hema Malini) यांना अनुक्रमे ३५,००० आणि ७५,००० इतकं मानधन दिलं गेलं होतं…(Sholay Movie cast)
================================
हे देखील वाचा: Pratiggya Movie : Dharmendra नाचला आणि पब्लिकने थिएटर डोक्यावर घेतले…
=================================
याव्यतिरिक्त सांभाची भूमिका साकारणाऱ्या Mac Mohan यांना १२,०००, कालियाची भूमिका साकारणाऱ्या ‘विजू खोटे’ यांना १०,००० आणि इमाम साब साकारणाऱ्या ‘ए.के.हंगल’ (A.K.Hangal) यांना ८,००० इतकं मानधन देण्यात आलं होतं…केवळ देशातच नव्हे तर जगभरात शोले चित्रपटाची क्रेझ फार आहे… अगदी काही वर्षांपूर्वी ३डी मध्येही ‘शोले’ रिलीज करण्यात आला होता… भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण करुन देणाऱ्या ‘शोले’च्या संपू्र्ण टीमला सलाम…(Latest Entertainment News)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi