Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Mrunmayee Deshpande : ‘मना’चे श्लोक’चा भन्नाट टीझर प्रदर्शित

Tango Malhar Movie Trailer: सिनेमातून उलगडणार रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास

MHJ Unplugged पॉडकास्ट सिरीजमध्येमधून उलगडणार आपल्या लाडक्या हास्यवीरांचं विनोदापलीकडलं आयुष्य

Kurla To Vengurla Trailer: ग्रामीण वास्तवाला विनोदी रंग देणारा कौटुंबिक

‘अमानुष’ : उत्तमकुमार- Sharmila Tagore यांचा अप्रतिम सिनेमा!

Siddharth Ray : “त्याला उचकी आली आणि…”, ‘अशी ही बनवाबनवी’तील

Jolly LLB 3: अक्षय कुमार-अर्शद वारसी येणार आमनेसामने!

Manoj Bajpayee : “मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो”!

सचिन पिळगांवकरांच्या तुफान ट्रोलिंगवर Shriya Pilgoankar म्हणाली, “शेवटी माझ्या बाबांना…”

Aatali Batami Phutli Trailer:  धमाल कॉमेडी आणि थराराने नटलेल्या सिनेमाचा ट्रेलर

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Dilip Kumar : दिलीप कुमार यांचा ‘काला आदमी’ हा सिनेमा का बनला नाही?

 Dilip Kumar : दिलीप कुमार यांचा ‘काला आदमी’ हा सिनेमा का बनला नाही?
बात पुरानी बडी सुहानी

Dilip Kumar : दिलीप कुमार यांचा ‘काला आदमी’ हा सिनेमा का बनला नाही?

by धनंजय कुलकर्णी 21/01/2025

भारतीय चित्रपट सृष्टीतील महान अभिनेता दिलीप कुमार (Dilip Kumar) आपल्या भूमिकांबाबत अत्यंत चूझी असायचे आणि प्रत्येक भूमिका १००% न्याय देऊन कशी करता येईल याकडे त्यांचा कल असायचा. त्यामुळे भूमिकेमध्ये संपूर्णपणे समरस होऊन कसा अभिनय करावा याचं प्रशिक्षण दिलीप कुमार यांच्या चित्रपटातून होत असे. दिलीप कुमार हे स्वतः एक समृध्द अभिनयाची प्रयोगशाळा होते. त्यामुळे साठेक वर्ष चित्रपट सृष्टीत घालवून ही त्यांनी अवघे ६०-६४ चित्रपट केले. प्रत्येक चित्रपटातील भूमिका त्यांच्यासाठी एक चॅलेंज असायची आणि ते मोठ्या खुबीने ती भूमिका साकारत.

पन्नासच्या दशकाच्या सुरुवातीला त्यांना एक भूमिका ऑफर झाली. ही भूमिका एका कोळसा खाण कामगाराची होती. चित्रपटाचे नाव होते ‘काला आदमी’. या चित्रपटाची निर्मिती दिलीप कुमार यांचे मोठे भाऊ आयुब खान यांनी केली होती. या सिनेमाची कथा त्यांनीच लिहिली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सैगल होते. या चित्रपटाला संगीत मदन मोहन यांचे असणार होते. या चित्रपटात कोळसा कामगारांच्या व्यथा मांडल्या होत्या. जेव्हा दिलीप कुमार (Dilip Kumar) कडे ही भूमिका आली तेव्हा यातील विषयातील वेगळेपण त्यांच्या लगेच लक्षात आले आणि या भूमिकेसाठी आपल्याला भरपूर मेहनत घ्यावी लागेल याची त्यांना जाणीव झाली. (Untold stories)

लगेच दिग्दर्शक Ramesh Saigal यांच्यासोबत ते बिहारमधील धनबाद येथील कोळसा खाणीच्या ठिकाणी गेले. तिथे त्यांनी मालकाच्या परवानगीने काही दिवस कामगारांच्यासोबत राहायचे ठरवले. कामगारांच्यासोबत ते रोज कामगारांचा गणवेश घालून डबा घेवून खाणीत जावू लागले. तिथे काम करू लागले. कामगार अशिक्षित होते, अडाणी होते. त्यांना हा काही प्रकार कळाला नाही. त्यांना हे नक्की माहीत होते की ही व्यक्ती काही कामगार नाही हा कुठल्यातरी बड्या श्रीमंताचा मुलगा आहे. कदाचित वडिलांशी भांडण करून रागाच्या भरात हा इथे आला आहे.

दिलीप कुमारसाठी ते काम खूप अवघड होत होतं. कारण असल्या शारीरिक मेहनतीच्या कामाची त्याला सवय नव्हती. पण मजा येत होती. सुरुवातीला कामगार त्याला अजिबात कोऑपरेट करत नाही उलट ते त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये बोलत दिलीप कुमारवर हसत होते. दिलीप कुमार (Dilip Kumar) मात्र तिथल्या कामगारांच्या देहबोलीचा बारकाईने अभ्यास करत होते. नंतर कामगारांना वाटले की कदाचित ही व्यक्ती म्हणजे दिल्लीहून कोणीतरी सीआयडी किंवा पोलिस असावा आणि इथल्या काही प्रकरणांचा शोध घेण्यासाठी आले असावेत. नंतर मात्र ते कामगार त्यांच्याशी मित्रत्वाने वावरू लागले.

दिलीप कुमारने त्यांना प्रश्न विचारून त्यांची जीवनधारा समजून घेतली. त्यांच्या हाल अपेष्टा दुःख वेतन याबाबत तो खूप काही बोलला. यातून त्याने तो संपूर्ण कोळसा कामगार आपल्यामध्ये उतरवून घेतला. चित्रपटाचे नंतर रीतसर शूटिंग सुरू झाले. पण याच दरम्यान आयुब खान यांचे निधन झाले. त्यामुळे फायनान्सर देखील मागे सरकले आणि हा चित्रपट बंद पडला. पुन्हा कुणीही सुरू करण्याचे प्रयत्न केले नाही. दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये या बंद पडलेल्या चित्रपटाबद्दल लिहिले आहे.

गंमत म्हणजे याच कथानकावर पाकिस्तानमध्ये मात्र १९५८ साली एक चित्रपट बनला. अयुब खान यांचे एक मित्र लुकमान यांनी पाकिस्तानमध्ये याच कथानकावर ‘आदमी’ हा चित्रपट बनवला होता. यानंतर १९६० साली भारतात ‘काला आदमी’ नावाचा एक वेगळ्या विषयावरील चित्रपट आला होता. यामध्ये अशोक कुमार, श्यामा, जॉनी वॉकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या सिनेमाचे दिग्दर्शन वेद मदन यांनी केले होते.

==============

हे देखील वाचा : Mohammed Rafi : सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी गायले म.रफीसोबत गाणे!

==============

त्यानंतर १९७८ साली पुन्हा एक ‘काला आदमी’ सिनेमा आला. ज्यामध्ये सुनील दत्त आणि Saira Banu यांच्या प्रमुख भूमिका होत्या. दिग्दर्शन रमेश लखनपाल यांचे होते. कोळसा कामगारांच्या प्रश्नावर यश चोप्रा यांनी १९८० साली ‘काला पत्थर‘ या नावाचा एक चित्रपट निर्माण केला आणि तो प्रचंड गाजला. यानंतर चार वर्षांनीच शत्रुघ्न सिन्हाला घेऊन ‘कालका’ नावाचा याच विषयावर चित्रपट आला होता त्याचे दिग्दर्शन लोकसेन ललवाणी यांनी केले होते. दिलीप कुमार (Dilip Kumar) मात्र आपल्या हातातून एक चांगला चित्रपट गेला याची खंत आयुष्यभर बाळगत राहिले!

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity News Dilip kumar Entertainment Featured kala aadmi madan mohan
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.