Thoda Tuza Ani Thoda Maza मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने शेअर

Nagraj Manjule : शाळेत असतानाच लागलेलं दारुचं व्यसन पण….; नागराज यांचा फिल्मी प्रवास…!
मराठी चित्रपटसृष्टीत बरेच दिग्गज कलाकार, दिग्दर्शक होऊन गेले… आणि आजही या कलाकारांचा वारसा पुढील पिढी जपत आहे… यातील एक महत्वाचं नाव म्हणजे दिग्दर्शक नागराज मंजुळे… ‘सैराट’ (Sairat) हा मराठीतील पहिला १०० कोटींचा चित्रपट देणाऱ्या नागराज यांचा चित्रपटसृष्टी आणि वैयक्तिक जीवनातला प्रवास सोप्पा नव्हता… लहानपणीच लागलेलं दारुचं व्यसन ते मोठ्या पडद्यावर यशस्वी दिग्दर्शक हा त्यांचा प्रवास कसा होता जाणून घेऊयात…(Nagraj Manjule)

नागराज मंजुळे स्वत:ची दोन नावं लावतात. पोपटराव मंजुळे हे नागराज मंजुळे यांचे जन्मदाते वडील. तर, कविता लिहिताना नागराज आपलं नाव नागराज बाबुराव मंजुळे असं लावतात. तर झालं असं की, त्यांच्या वडिलांनी त्यांचे भाऊ बाबुराव मंजुळे यांना नागराज मंजुळे यांना लहानपणीच दत्तक म्हणून दिलं होतं. नागराज यांचं बालपण फार ट्रॉमात गेलं.. सहावी-सातवीत असतानाच त्यांना दारू प्यायची वाईट सवय लागली होती… वडिलांसाठी दारू आण्यासाठी गेलेला हा मुलगा हळूच चोरून दारू प्यायला लागला… आणि नंतर त्याच बाटलीत हापशावरील पाणी भरून नव्याने बाटली उघडण्याचा अभिनय देखील नागराज शिकले… कालांतराने जरी त्यांनी त्यांच्याच चित्रपटात अभिनय केला असला तरी लहानपणीच त्यांची अभिनयाची शाळ सुरु झाली होती…

नागराज यांना केवळ दारुचंच नाही तर पुढे जाऊन गांजा आणि बिड्यांच व्यसन लागलंच… काकांकडे दत्तक म्हणून गेलेल्या नागराज यांच अभ्यासात फारस मन कधीच रमलं नाही… १०वीला चक्क ३ वेळा नापास झालेल्या नागराज यांचं कधी एकदा शिक्षण संपतंय आणि नवीन दुनियेत प्रवेश करतोय असं झालं होतं… नागराज यांनी बऱ्याच मुलाखतींमध्ये सांगितलं आहे की त्यांच्या बालपणाबद्दल त्यांना कधीच खंत वाटली नाही, याऊलट त्याच परिस्थितीमुळे मी घडलो असं ते अभिमानाने सांगतात…
नागराज मंजुळे यांची चित्रपटाची कारिकिर्द सुरु होण्यापूर्वी महाराष्ट्र पोलिस सेवेत त्यांची निवड झाली होती… मात्र काही महिन्यातच प्रशिक्षण सोडून नागराज घरी परत आले होते. इतकंच नाही तर नागराज यांना जेव्हा पैशाची अडचण आली होती तेव्हा त्यांनी सुरक्षा रक्षकाची नोकरी देखील केली होती. दिग्दर्शक म्हणून नावारुपास येण्याआधी नागराज यांनी मराठी साहित्यात मोलाचं योगदान दिलं आहे.. त्यांच्या कवितासंग्रहांचं लोकांनी कौतुक केलं आहे… कालांतराने मात्र कवी ही त्यांची एकमेव ओळख राहिली नाही आणि पुढे त्यांनी मोठा पडदा गाठला…
================================
हे देखील वाचा: जेव्हा Nagraj Manjule यांचा राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेला होता…
=================================
अन्यायाला वाचा फोडण्यासाठी चित्रपट हे उत्तम मध्यम आहे असं त्यांना वाटू लागलं… एका मित्राने बनवलेल्या लघुपटाला पारितोषिक मिळाल्यानंतर नागराज यांची उमेद अजूनच वाढली… अर्धवट सोडलेलं शिक्षण देखील पुर्ण करण्याचा निर्णय घेत नागराज यांनी पुणं गाठलं… वाचनाच्या छंदामुळे ते दिवसेंदिवस अधिकच परिपक्व होत गेले.. बीएला त्यांनी फर्स्ट क्लास मिळवला… नगरला मास कॉमला नागराज यांनी अॅडमिशन घेतलं… नेट सेट परीक्षांमध्ये आलेलं अपयश मागे टाकत त्यांनी ‘पिस्तुल्या’ हा लघुपट लिहिला आणि या लघुपटाला २ राष्ट्रीय पारितोषकं मिळाली. पहिल्याच मोठ्या प्रयत्नात नागराज यांना उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला… लवकरच सैराटच्या तोडीस तोड त्यांचा चित्रपट यावा अशी अपेक्षा नक्कीच त्यांचे चाहते करत असून नागराज दिग्दर्शित खाशाबा हा बायोपिक लवकरच येणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi