Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर ६ महिन्यांत संभाजी महाराज कसे नाचतील? ‘छावा’तील दृश्यावर Digpal Lanjekar यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज म्हणजे आपलं आराध्य दैवत… आजवर या दोन्ही राजांचा गौरवशाली इतिहास नाटक, चित्रपट, मालिकांमधून आपण पाहिला आहेच… याच वर्षी लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava) चित्रपटातून पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास दाखवण्यात आला होता… विकी कौशलने साकारलेल्या शंभुराजांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी प्रेम तर दिलं.. पण ऐतिहासिक चित्रपट म्हटलं की जरा वाद-विवाद होतातच… असाच वाद ‘छावा’च्या बाबतीतही झाला होता आणि तो म्हणजे यात एका सीनमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई लेझिम खेळताना दाखवले होते.. पण या सीनवर आक्षेप घेत हा चित्रपटातून तो हटवण्यात आला.. आता याच मुद्द्यावर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित करत असं म्हटलं आहे की, जर सहा महिन्यांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांचा निधन झालेलं. एवढा आभाळासारखा बाप हरपलेला असताना कोणताही मावळा, सरदार कोणीही कितीही आग्रह केला तरीही आकाशाएवढ्या पित्याला दैवत मानणाऱ्या राजपुत्राकडून नृत्य घडेल का? असा प्रश्न मेकर्सना विचारला आहे… नक्की काय म्हणाले आहेत दिग्पाल जाणून घेऊयात… (Laxman Utekar Chhaava movie)
मराठी फिल्म इंडस्ट्रीत शिवराज अष्टक ही ८ चित्रपटांची चैन सुरु केली.. युवापिढीला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महारज यांचा इतिहास समजावा हाच या मागचा लांजेकरांचा उद्देश आहे… परंतु, ‘छावा’ चित्रपटात मेकर्सचा इतिहासाच्या बाबतीत अभ्यास कमी पडला असा आरोप दिग्पाल यांनी केला आहे… मराठी मनोरंजन विश्व युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत लांजेकर म्हणाले की, “छत्रपती संभाजी महाराज हे सुद्धा नक्कीच लेझीम खेळले असतील कारण तो एक महाराष्ट्राचा मर्दानी खेळ आहे. परंतु ते खेळत असताना प्रसंग कुठला आहे त्याचं तारतम्य काय? याचा विचार केला पाहिजे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्या लोकांनी इतिहासाबद्दल खूप कमी लिहून ठेवलं आहे. त्यामुळे मी एका फिल्म मेकरची अडचण समजू शकतो; कारण मी सुद्धा त्यातून बऱ्याचदा जातो. अनेक ठिकाणी इतिहास मुका असतो. हे कसं घडलं असेल याबाबत नोंद नसते. त्यामुळे जेव्हा त्या घटनांचे बिंदू तुम्हाला सापडतात तेव्हा ते जोडण्यासाठी तुम्हाला लॉजिकच वापराव लागतो. कलात्मक स्वातंत्र्य घ्यावं लागतं. एवढीच लिबर्टी घ्यावी असं मला वाटतं. म्हणजे मग पुढे वाद उद्भवत नाहीत. मी आतापर्यंत 7 चित्रपट केले पण एकदाही त्याबाबत वाद झालेला नाही कारण मी ते श्रद्धेने केलेले आहेत.” (Marathi Movies)

इतकंच नाही तर पुढे त्यांनी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित करत असं म्हटलंय की, “‘छावा’ मधून नृत्य सीन वगळण्यात आला कारण यावर माझं स्पष्ट मत आहे की, त्यांचा थोडासा इतिहासाचा अभ्यास कमी पडला असावा. चित्रपटाच्या दिग्दर्शनाबद्दल मी अत्यंत आदराने नमूद करू इच्छितो की जर सहा महिन्यांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांचा निधन झालेलं. एवढा आभाळासारखा बाप हरपलेला असताना कोणताही मावळा, सरदार कोणीही कितीही आग्रह केला तरीही आकाशाएवढ्या पित्याला दैवत मानणाऱ्या राजपुत्राकडून नृत्य घडेल का? हा लॉजिकचा भाग आहे. त्याचवेळीस्वराज्या भोवतालची परिस्थिती फार वेगळी होती”… (Digpal Lanjekar News)

पुढे त्यांनी असं देखील म्हटलंय की, “शिवाजी महाराजांचा छत्रपती बनवतानाचा राज्याभिषेक सोहळा जेवढा मोठा झाला तेवढा छत्रपती संभाजी महाराजांचा झाला नाही कारण त्यावेळी स्वराज्याच्या आजूबाजूची परिस्थिती ही संक्रमण अवस्थेसारखी होती. जेव्हा शिवाजी महाराजांचं निधन झालेलं तेव्हा संधीचा फायदा घेत सगळे शत्रू एकाच वेळी तुटून पडले होते. अशावेळी कुठलाही मोठा राजपुत्र या सोहळ्यात रमणार नाही. परिस्थितीचे भान ठेवत संभाजी महाराजांनी तो सोहळा अगदी छोटेखानी स्वरूपात केला. यातूनच त्यांचा जाणतेपणा दिसतो. हा तारतम्याचा भाग चित्रपट करताना बाळगला पाहिजे असं आम्हाला वाटतं. त्यासाठी अभ्यास आणि त्या काळाच्या परिस्थितीचा भान ते लॉजिक अभ्यासातूनच येतं.”
================================
हे देखील वाचा : Laxman Utekar: ‘छावा’निमित्त लक्ष्मण उतेकर यांची विशेष मुलाखत
================================
आता लांजेकरांच्या या आरोपांवर आणि लॉजिकच्या विधानांवर लक्ष्मण उतेकर काही प्रतिक्रिया देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे… खरं तर कुठलीही ऐतिहासिक कलाकृती साकारताना इतिहासाचा चोख अभ्यास, पुरावे आणि जर का काही पुरावे नसतील तर त्यावेळची भौगोलिक, सामाजिक, आर्थिक आणि लोकांची मानसिक स्थिती काय होती असेल याचा विचार नक्कीच मेकर्सने करायला हवाच…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi