Divyanka Tripathi आणि Vivek Dahiyaची युरोपात झाली लूटमार; पैसे-पासपोर्ट ही गेले चोरीला
टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया सध्या भारतापासून दूर युरोपमध्ये सुट्टी साजरी करत आहेत. आणि या दरम्यानचे या जोडप्याने तिथले अनेक व्हिडिओ आणि फोटो देखील शेअर केले आहेत. हे कपल त्यांच्या क्यूट स्टाईल आणि प्रेमामुळे चर्चेत आहे, पण नुकतेच युरोपमध्ये त्यांच्यासोबत असे काही घडले आहे ज्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. आणि या बातमीने त्यांच्या चाहत्यांना ही धक्का बसला आहे. या सेलिब्रिटी जोडप्याच्या सामानाची चोरी झाली असून या दरम्यान त्यांचे पैसेच नव्हे तर त्यांचे खरेदीचे सामान आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे पासपोर्ट, पर्स ही लंपास करण्यात आली आहे. या जोडप्यासह नेमकं काय घडलं आहे आणि सध्या हे जोडपं कुठे आहे हे सविस्तर जाणून घेऊयात.(Divyanka-Vivek Robbed)
दिव्यांका आणि विवेक यांनी या घटनेची माहिती दिली आहे. सध्या हे दोघेही इटलीतील फ्लॉरेन्समध्ये रोमँटिक हॉलिडे एन्जॉय करत होते. त्यानंतर त्यांच्यासोबत हा चोरीचा प्रकार घडला. या जोडप्याला भारतात परतण्यातही अडचण येऊ शकते, ज्यामुळे हे जोडपे चिंतेत आहे. दिव्यांकाने भारतात परतण्यासाठी मदतीची विनंती केली आहे. या चोरीत दिव्यांका आणि विवेकच्या कपड्यांपासून पर्सपर्यंत सर्व काही चोरीला गेले आहे, त्यात काही रोख रक्कम, कार्ड आणि पासपोर्ट ही असल्याची माहीती समोर आली आहे.
दिव्यांका आणि विवेक आपल्या लग्नाचा आठवा वाढदिवस रोमँटिक पद्धतीने साजरा करण्यासाठी इटलीला गेले होते. जिथले चोरी होईपर्यंत हे जोडपे आपल्या सुट्टीच्या सर्व अपडेट सतत सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत होते. दिव्यांकाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “विवेक आणि मी सुरक्षित आहोत, परंतु आमच्या रिसॉर्टच्या मालमत्तेत आमच्या कारमधून बहुतेक जीवनावश्यक वस्तू, पासपोर्ट, बँक कार्ड आणि महागड्या वस्तू गायब झाल्या आहेत. आम्हाला शक्य तितक्या लवकर एम्बेसी कडून मदत मिळेल अशी आशा आहे.”(Divyanka-Vivek Robbed)
=============================
==============================
विवेक दहिया याने ही मुलाखतीत सांगितले की, ‘आम्ही स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला होता, परंतु त्यांनी त्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, त्यामुळे ते मदत करू शकले नाहीत, असे सांगून आमची केस फेटाळून लावली. त्यांनी त्या ठिकाणी येण्याची तसदीही घेतली नाही. सकाळी ६ वाजता पोलिस स्टेशन बंद होते आणि त्यानंतर ते कुठलीही मदत करत नाहीत. आम्ही एम्बेसीपर्यंत पोहोचण्याचा ही प्रयत्न केला पण दुर्दैवाने तेही त्या दिवसासाठी बंद होते.