Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

Dream Girl 2 First Look: ड्रीम गर्ल 2 मधील आयुषमानचा फर्स्ट लूक रिलीज; मुलीच्या वेषात जिंकले प्रेक्षकांचे मन
आयुषमान खुरानाचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘ड्रीम गर्ल 2’ सध्या चर्चेत आहे. या सिनेमाशी संबंधित अनेक व्हिडिओ आतापर्यंत आपल्या समोर आले असून आता फायनली या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. आयुषमान खुरानाचा पूजाच्या भूमिकेतील लूक सोशल मीडियावर समोर आला आहे. आयुषमानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. ज्यामध्ये त्याचा पूजा अवतार दिसतो.हे पोस्टर पाहुन आता आयुषमान खुरानाला पूजाच्या लूकमध्ये पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक झाले आहेत.चित्रपटाचा मुख्य अभिनेता आयुषमानने स्वत: आपल्या सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्रामवर पूजाची पहिली झलक शेअर केली आहे. यासोबतच त्याने एक कॅप्शनही दिलं आहे. आयुषमान ने कॅप्शनमध्ये लिहलय, ””ही फक्त पहिली झलक आहे. गोष्टी आरशात दिसण्यापेक्षा अधिक सुंदर असतात.”(Dream Girl 2 First Look)

हा लूक समोर येताच आता प्रत्येकजण त्याची चर्चा करत आहे. आणि लुक असल्याने आता प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयुषमान खुरानाने या चित्रपटात पूजाची भूमिकेचा जो गेटअप केला आहे तो खरच पाहण्यासारखी आहे .फर्स्ट लुक च्या पोस्टरमध्ये आयुष्मान पडद्याआड डोकावताना दिसत असून फक्त त्याचा चेहरा दिसत आहे. आयुषमानचा लूक एका मुलाचा आहे, पण पडद्यामागे लांब केस असलेल्या मुलीची सावली दिसत आहे. हे पोस्टर बघायला खूपच इंटरेस्टिंग दिसत आहे, ज्यात आयुषमान हा मुलगा आहे हे स्पष्ट दिसत आहे, पण त्याच्या आत एक मुलगीदेखील आहे. आयुषमानने इन्स्टाग्रामवर हे पोस्टर शेअर करत “पूजा ड्रीम गर्ल लवकरच येत आहे. ड्रीम गर्ल २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. “असे ही लिहिले आहे.

पूजाचा हा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली की, ‘आयुषमान सर तुमचा ड्रीम गर्ल लूक इतका भन्नाट आहे,’ तर दुसऱ्या युजरने कमेंट केली की, ‘एक माणूस विग, मेकअप आणि स्कर्टने इतका सुंदर कसा दिसू शकतो.” आयुषमानच कौतुक करण्याच्या अशा अनेक कमेंट तय पोस्ट खाली नेटकऱ्यांनी लिहिल्या आहेत.(Dream Girl 2 First Look)
==========================
हे देखील वाचा: Project-K Teaser: ‘हे’ आहे प्रभासच्या सिनेमाच नवे नाव; धमाकेदार टीजर ही आला समोर
==========================
‘ड्रीम गर्ल २’ ची निर्मिती एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी केली असून हा सिनेमा राज शांडिल्य दिग्दर्शित आहे. हा चित्रपट ‘ड्रीम गर्ल’चा सिक्वेल आहे. यात आयुषमानसह अन्नू कपूर, विजय राज, मनजोत सिंग आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या पहिल्या भागात आयुषमान खुरानासोबत नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत होती. तर या भागात तिच्या जागी अनन्या पांडे दिसणार आहे.