Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

Emraan Hashmi : इम्रानचा ‘आवारापन २’ लवकरच येतोय….
बॉलिवूडमधील सिरीयल किसर बॉय इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) याच्या वाढदिवशी त्याने चाहत्यांना एक नवी भेट दिली आहे. आजवर इम्रानने ज्या ज्या चित्रपटात कामं केली त्यापैकी काही चित्रपट तुफान गाजले पण सगळ्याच चित्रपटांतील गाणी ऑल टाईम ब्लॉकबस्टर ठरली. इम्रानचे बरेच असे चित्रपट आहेत ज्याचे खरं तर सीक्वेल्स यायला हवे. आणि प्रेक्षकांच्या या मागणीचा मान ठेवत इम्रानने ‘आवारापन २’ (Awarapan 2) च्या सीक्वेलची नुकतीच घोषणा केली आहे. इम्रानने २००७ च्या ‘आवारापन’ या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करून त्याच्या सिक्वेलची अधिकृत घोषणा केली आहे. (Bollywood upcoming movies)
इम्रानने (Emraan Hashmi) सोशल मिडीयावर ‘आवारापन २’ चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नायक एका बोटीवर उभे राहून सूर्यास्ताच्या प्रकाशात असलेल्या आकाशकडे पाहत आहे. त्याचवेळी तो एका पक्ष्याला पिंजऱ्यातून मुक्त करतो आणि म्हणतो, “दुसऱ्याच्या आयुष्यासाठी मरणे हे माझे भाग्य आहे. या टीझरचा शेवट “आवारापन २ – प्रवास सुरूच आहे” या टायटलने होतो आणि बॅकग्राऊंडला ‘तेरा मेरा रिश्ता’ हे गाणं वाजत राहतं. (Emraan Hashmi movies)

दरम्यान, ‘आवारापन २’ (Awarapan 2) चित्रपट ३ एप्रिल २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. टीझर शेअर करताना, “बस मुझे कुछ और देर जिंदा राख… #आवारापन२ सिनेमागृहात, ३ एप्रिल २०२६”, असंही त्याने लिहिलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडत असून नेटकरी आतुरतेने सीक्वेलची वाट पाहात आहेत. काही नेटकरी लिहितात,“सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक, लॉर्ड इमरान.”,“शेवटी, हा चित्रपट येत आहेच” तिसऱ्या कमेंटमध्ये लिहिले होते, क्या बात है सर शेवटी ‘आवारापन २’ कन्फॉर्म झालाच”. (Entertainment masala)
===========================
हे देखील वाचा: Emraan Hashmi : चित्रपट नव्हे तर सुपरहिट गाणी देणारा अभिनेता!
===========================
२००७ मध्ये आलेल्या ‘आवारापन’ चित्रपटाचं दिग्दर्शन मोहित सुरीने (Mohit Suri) केलं होतं तर महेश भट्ट (Mahesh Bhatt) चित्रपटाचे निर्माते होते. महेश भट्ट यांनी खरं तर कमी बजेटमध्ये चित्रपट बनवून बॉक्स ऑफिसवर हिट चित्रपट दिले होते. पण आवारापनच्या बाबतीत जरा गणित उलटं झालं होतं.हा चित्रपट १८ कोटींच्या बजेटमध्ये जे भट्ट यांचं सर्वाधिक बजेट होतं त्यात तयार केला गेला होता पण कर्मशिअली हा चित्रपट फ्लॉप झाला होता. मात्र, चित्रपटातील प्रत्येक गाणी सुपरहिट झाली होती आणि यात मराठमोळे अभिनेते अतुल परचुरे यांना विशेष क्रेडिट मिळालं होतं. इम्रानसोबत या चित्रपटात श्रिया सरन ही अभिनेत्री झळकली होती. (Entertainment trending news)
