‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Pushpa 2 : डेब्यु चित्रपट फ्लॉप ठरला आणि अभिनेता गेला अमेरिकेला….
पुष्पा चित्रपट केवळ अल्लू अर्जूनमुळेच नाही तर अभिनेता फहाद फासिल (Fahad Fazil) याच्या उत्कृष्ट अभिनयामुळे देखील विशेष लक्षात राहिला… मल्याळम चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात विशेष जागा निर्माण करणारा फहाद निर्माता देखील आहे…. पण तुम्हाला माहित आहे का आता जरी फहाद आता जरी सुपरस्टार असला तरी त्याचा पहिला चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर तो इंडस्ट्री सोडून थेट अमेरिकेला गेला होता.. काय होतं नेमकं प्रकरण चला जाणून घेऊयात…

फहाद प्रसिद्ध दिग्दर्शक फाजिल यांचा मुलगा… त्याच्या वडिलांनीच २००२ मध्ये ‘Kaiyethum Doorath’ या रोमँटिक चित्रपटातून त्याचं इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं… यात त्याने सचिनची भूमिका साकारली होती आणि त्याच्या सोबत निकिता ठुकराल ही अभिनेत्री प्रमुख भूमिकेत होती. खरं तर पहिल्या चित्रपटाकडून इतरांप्रमाणेच त्यालाही प्रचंड अपेक्षा होती पण तो चित्रपट फ्लॉप ठरला… प्रेक्षकांना चित्रपटही आवडला नाही आणि फहादचा अभिनयदेखील…
फहाद फासिल याचा पहिला चित्रपट अयश्वी झाल्यामुळे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होऊन फहाद थेट अमेरिकेला निघून गेला. याबद्दल एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, “अपयशासाठी दुसऱ्यांना दोष देण्यात अर्थ नाही. मी पुरेशी तयारी न करता इंडस्ट्रीत आलो. त्यामुळे तो माझा दोष होता”.दरम्यान, अमेरिकेत काही वर्ष राहून फहादने स्वतःमध्ये बदल घडवले आणि २००९ मध्ये तो पुन्हा भारतात आला…

अमेरिकेतुन परत आल्यानंतर ‘प्रमणी’, ‘कॉकटेल’सारख्या चित्रपटांनी फहादला प्रसिद्धी मिळवून दिली. मात्र, २०११ मध्ये आलेल्या ‘Chaappa Kurishu’ चित्रपटाने त्याला खास ओळख मिळवून दिली…पुढे ‘इंडियन रुपये’, ‘22 फीमेल कोट्टायम’, ‘डायमंड नेकलेस’, ‘D Company’, ‘Take Off’, ‘Trance’, ‘सी यू सून’, ‘सुपर डिलक्स’, ‘कार्बन’ यांसारखे दर्जेदार चित्रपट केले…
================================
हे देखील वाचा : Karisma Kapoor : बबिता कपूरमुळे करिश्मा कपूरच्या पायाला झालेली दुखापत?
=================================
मात्र, पुष्पा चित्रपटाने फहादला देशभरातच नाही तर जगभरात विशेष ओळख मिळवू दिली.. त्याच्या सिनेकारकिर्दीतील सर्वात मोठ्या कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला होता. फहाद फासिल लवकरच ‘Odum Kuthira Chaadum Kuthira’, ‘Don’t Trouble The Trouble’, ‘कराटे चंद्रन’ यांसारख्या बहुप्रतिक्षित चित्रपटांत दिसणार आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi