
अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘Family Man 3’; अभिनेता मनोज वाजपेयीनी दिल्या अपडेट्स
‘द फॅमिली मॅन’ या लोकप्रिय वेब सिरीजच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सीझन 3 संदर्भातील चर्चा आणि अंदाज आता संपली असून, अखेर या बहुचर्चित सिरीजच्या नव्या पर्वाची रिलीज डेट समोर आली आहे. अभिनेता मनोज बाजपेयी यांनीच ही बातमी नुकतीच अधिकृतपणे दिली असून, या सिझनमध्ये एक नवीन चेहरा जयदीप अहलावत ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘रेडिफ’च्या रिपोर्टनुसार, ‘द फॅमिली मॅन 3’ हे नविन पर्व यंदा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. खुद्द मनोज बाजपेयी यांनीही पत्रकार सुभाष के. झा यांच्याशी संवाद साधताना या बातमीला दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे या सिझनचं शूटिंग पूर्ण झालं आहे, आणि आता प्रेक्षकांच्या उत्सुकतेला पूर्णविराम मिळणार आहे.(Family Man 3 Release Date)

गेल्या सिझनमध्ये जसं सामंथा रुथ प्रभूचं पात्र विशेष चर्चेत आलं होतं, तसंच या वेळीही जयदीप अहलावतचा करिश्मा प्रेक्षकांना खिळवून ठेवणार, अशी जोरदार चर्चा आहे. याबाबत बोलताना बाजपेयी हसून म्हणाले, “सिझन 2 मध्ये सामंथा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू होती, तर यंदाच्या सिझनमध्ये जयदीप ते स्थान घेणार आहे.”

जयदीप अहलावत, जो आपल्या प्रखर अभिनयशैलीसाठी ओळखला जातो, त्याची उपस्थिती या सिझनमध्ये एक वेगळा ट्विस्ट घेऊन येणार आहे. ‘पाताल लोक’सारख्या सिरीजमधून त्याने आपली अभिनय ताकद सिद्ध केली आहे आणि आता ‘द फॅमिली मॅन’मध्ये त्याची एन्ट्री ही कथानकात नवा थरार निर्माण करणार, हे नक्की. दिग्दर्शक राज आणि डीके यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत असलेल्या या सिझनबाबत बाजपेयी म्हणतात, “मला अशा कलाकारांसोबत काम करायला आवडतं जे कामाबाबत तितकेच समर्पित असतात, जितका मी स्वतः आहे.” त्यामुळे त्यांच्या आणि जयदीपच्या जुगलबंदीवर प्रेक्षकांना विशेष अपेक्षा आहेत.
==============================
हे देखील वाचा: Kaun Banega Crorepati 17 PROMO: ‘या’ दिवसापासून अमिताभ बच्चन पुन्हा भेटायला येणार !
==============================
जशी-जशी रिलीज डेट जवळ येते आहे, तसतसं प्रेक्षकांमध्ये उत्सुकता ही वाढत आहे. अनेकांना वाटतंय की, ‘द फॅमिली मॅन’चा हा सिझन आतापर्यंतचा सर्वात थरारक आणि दमदार सिझन ठरेल, कारण त्यात आहे मनोज बाजपेयीसारखा अनुभवी अभिनेता आणि जयदीप अहलावतसारखा उर्जावान कलाकार.