Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Gaadi Number 1760 Movie Trailer: रहस्य, थरार आणि विनोदाने भरलेल्या गाडी नंबर १७६० चा ट्रेलर पदर्शित !
Gaadi Number 1760: मराठी सिनेमांच्या बदलत्या प्रवाहात थ्रिलर, रहस्य आणि हास्याचा मेळ साधणारे काहीच चित्रपट लक्षात राहतात. त्यात लवकरच भर घालणारा एक वेगळा चित्रपट म्हणजे ‘गाडी नंबर १७६०’. तन्वी फिल्म्स प्रस्तुत आणि योगीराज संजय गायकवाड दिग्दर्शित हा सिनेमा, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमुळे चर्चेचा विषय ठरतोय. या ट्रेलरमध्ये दिसणाऱ्या एका काळ्या बॅगेभोवती फिरणारी कथा प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करतेय. पैशांनी भरलेली ही बॅग नेमकी कोणाची? तिचं गुपित काय? आणि या सर्वात “गाडी नंबर १७६०” चा काय संबंध? हे रहस्य ४ जुलै रोजी चित्रपटगृहात उलगडणार आहे.(Gaadi Number 1760 Movie Trailer)

सिनेमाची कथा जरी हलक्याफुलक्या मांडणीची वाटत असली तरी, त्यामागे गंभीर, विचारप्रवृत्त करणारी बाजूही आहे. चित्रपट प्रेक्षकांना हास्याने खळखळवतानाच, एक आशयघन गूढतेचा प्रवास अनुभवायला लावणार आहे. दिग्दर्शक योगीराज गायकवाड यांच्या मते, “हा सिनेमा फक्त रहस्य नाही, तर माणसाच्या हव्यासाचा आणि नैतिक गोंधळाचा आरसा आहे. प्रत्येक पात्र बॅगेच्या मागे का लागलं आहे, त्यामागचं कारण वेगळं, पण उद्दिष्ट एकच पैसा. आम्ही कथानकात काही अनपेक्षित वळणं देऊन प्रेक्षकांचा अनुभव अजून खास केला आहे.”

तन्वी फिल्म्सचे निर्माते कैलाश सोराडी यांचा विश्वासही ठाम आहे. ते म्हणतात की , “प्रेक्षकांसाठी दर्जेदार आणि वेगळं कथानक घेऊन येणं, हा आमचा प्रयत्न आहे. ‘गाडी नंबर १७६०’ हा मनोरंजनाबरोबर विचार करायला लावणारा चित्रपट आहे. प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करत त्यांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणं, ही या चित्रपटाची ताकद आहे.” (Gaadi Number 1760 Movie Trailer)
========================================
========================================
या चित्रपटात प्रथमेश परब (Prathmesh Parab), शुभंकर तावडे (Shubhankar Tawade) , प्रियदर्शिनी इंदलकर (Priydarshini Indalkar) , सुहास जोशी, प्रसाद खांडेकर, श्रीकांत यादव आणि शशांक शेंडे यांसारख्या अनुभवसंपन्न कलाकारांचा सहभाग असून, ही स्टारकास्टच सिनेमाच्या दमदारतेची ग्वाही देते.