Gadar 2: ‘उड़ जा काले कांवा’ चा फर्स्ट लूक रिलीज,पाहा सकीना आणि तारा सिंगची जोडी
सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा ‘गदर‘ हा चित्रपट चाहत्यांना चांगलाच आवडला होता. अशातच सिक्वेल ‘गदर २’ (Gadar 2) च्या घोषणेपासून त्यांचे चाहते सिनेमाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘गदर २’ हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. आता चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे की, त्यांच्या चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘उड जा काले कावा’ गुरुवारी म्हणजेच आज रिलीज होत आहे.पण त्या आधी त्यांनी या गाण्याची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आणि त्याबद्दल त्यांनी लिहिलंही आहे की, ‘उड जा काले कावा’ हे गाणे गुरुवार, २९ जून रोजी प्रदर्शित होत आहे. ‘गदर २’मधील ‘उड जा काले कावा’ हे गाणे २९ जून रोजी प्रदर्शित करण्यात येत आहे. उदित नारायण यांनी या गाण्याला आवाज दिला असून, त्यांनी या गाण्याचे आधीचे व्हर्जनही गायले आहे. (Gadar 2)
मात्र या गाण्याच्या टीझरवर कमेंट करत जुबिन नौटियाल हे गाणं गाणार असल्याचा दावा लोक करत आहेत. झुबिन व्हर्जन कधी रिलीज होणार, असा प्रश्नही ते कमेंट बॉक्समध्ये विचारत आहेत. आता हे गाणं आल्यानंतरच कळेल की निर्माते या गाण्यात ट्विस्ट देणार आहेत. की ते तसेच आपल्याला पहायला मिळेल.तब्बल २२ वर्षांपूर्वी रुपेरी पडद्यावर जादू पसरवणाऱ्या सनी देओलच्या ‘गदर’ चित्रपटाच्या आठवणी आजही लोकांच्या मनात ताज्या आहेत. आता ११ ऑगस्ट रोजी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. ‘गदर २’ मध्ये तारा सिंह आणि सकीना यांच्या प्रेमकथेचा पुढील भाग दाखवण्यात येणार आहे.
दरम्यान अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २ : द कथा कंटिन्यू’ हा चित्रपट येत्या ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट २००१ मध्ये आलेल्या ‘गदर : एक प्रेमकथा’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. चित्रपटात सनी देओल, अमीषा पटेल, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर, लव सिन्हा, मनीष वाधवा आणि गौरव चोप्रा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.(Gadar 2)
==========================
हे देखील वाचा:
==========================
सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर या चित्रपटात पहिल्या भागात सकीना आणि ताराचा मुलगा बनलेला उत्कर्ष शर्मा देखील दिसणार आहे. तर अभिनेत्री सिमरत कौर तारा सिंगच्या सुनेच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट रणबीर कपूरच्या अॅनिमल आणि अक्षय कुमारच्या ओह माय गॉड २ ला टक्कर देणार आहे.