
Saiyaara : बॉक्स ऑफिसवर ‘सैयारा’ची जोरदार बॅटिंग ४ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!
बॉलिवूडसाठी २०२५ हे वर्ष खास आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही…’स्काय फोर्स’, ‘छावा’ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करायला सुरुवात केली आणि पुढे ‘रेड २’, ‘हाऊसफुल्ल ५’ या चित्रपटांनी हा सिलसिला पुढे सुरुच ठेवला… आता लवकरच १०० कोटी क्लबच्या यादीत नुकताच प्रदर्शित झालेला ‘सैयारा’ (Saiyaara movie) हा चित्रपट सामिल होणार असून केवळ ४ दिवसांतच या चित्रपटाने यशस्वी कामगिरी बॉक्स ऑफिसवर केली आहे… जाणून घेऊयात चित्रपटाची कमाई….(Bollywood News)

तर, मोहित सूरी दिग्दर्शित ‘सैयारा’ चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित झाला… भली मोठी कास्ट किंवा नावाजलेले चेहरे नसुनही या चित्रपटाला प्रेक्षकांना अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे…’सैयारा’ चित्रपटातून अनन्या पांडे हिचा भाऊ अहान पांडे आणि अभिनेत्री अनीत पड्डा ही नवी जोडी भेटीला आली आहे…आता वळूयात कमाईकडे… तर,’सैयारा’च्या अॅडव्हान्स बुकिंगलाही जोरदार प्रतिसाद मिळाला होता. सॅकनिल्कच्या माहितीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी २१ कोटी, दुसऱ्या दिवशी २५ कोटी, तिसऱ्या दिवशी ३७ कोटी, चौथ्या दिवशी २.८६ कोटी कमवत आत्तापर्यंत एकूण ८५.८६ कोटींची कमाई केली आहे… अवघ्या ४ दिवसांतच या चित्रपटाने १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री करण्याची दमदार तयारी केली आहे… (Saiyaara Movie box office collection)
================================
=================================
दरम्यान, या आधी ‘रेड २’, ‘हाऊसफुल्ल ५’, ‘छावा’, ‘स्काय फोर्स’, ‘सिकंदर’, ‘इमर्जन्सी’,’भूल चुक माफ’ असे बरेच चित्रपट रिलीज झाले असून सगळ्यांनीच बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे… शिवाय, लवकरच, ‘रामायण’, ‘दे दे प्यार दे २’, ‘जॉली एल.एल.बी ३’, ‘वॉर २’,’धडक २’, ‘दृश्यम ३’ अशा बऱ्याच चित्रपटांकडून प्रेक्षकांना फार अपेक्षा आहे…(Upcoming Bollywood Moviesd)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi