Cannes film Festival 2025 : मराठमोळ्या नेहा पेंडसेचा खास कान्स

जिनीलिया व रितेश देशमुख यांची चित्रपट महामंडळाला भरघोस मदत
जागतिक कोरोना महामारीमुळे आपल्याला सामोरा आलेला लाँकडाऊन, ठप्प झालेली सिने इंडस्ट्रीयामुळे सर्वसामान्य रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार, तंत्रज्ञ, ज्युनियर कलाकार यांची उपासमार चालू झाली. याचवेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने या सर्वांना आर्थिक वा अन्नधान्य किराणा कीट यास्वरुपात मदत चालू केली. आतापर्यंत २००० सभासदांपर्यंत ही मदत अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक व गावोगावच्या समिती सदस्यांमार्फत पोचवली गेली आहे. परंतु महामंडळाची सभासद संख्या लक्षात घेऊन त्यातील गरजू सभासदांना नाव नोंदणी करण्यास सांगण्यात आले असता आतापर्यंत ५००० पेक्षा जास्त सभासदांनी नाव नोंदणी केली आहे. या सर्व सभासदांना मदत करता यावी यासाठी मेघराज राजेभोसले- अध्यक्ष, पदाधिकारी व संचालकांनी समाजातील दानशूर व्यक्ती व बाँलीवूड स्टार्सना मदतीचे आवाहन केले होते.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अभिनेत्री जिनीलिया रितेश देशमुख व रितेश विलासराव देशमुख हे दांपत्य धावून आले. व त्यांनी त्यांच्या मुंबई फिल्म कंपनीतर्फे रु. १०,००,०००/(रु.दहा लाख) एवढी मदत केली आहे. तसेच त्यांनीही इतर कलावंतांना चित्रपट महामंडळाला मदत करण्याचे आवाहन ही केले आहे.
अ.भा.म.चित्रपट महामंडळातर्फे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी जिनीलिया व रितेश देशमुख यांचे व आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे आभार मानले आहेत.