Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Super Duper Movie Poster ने वाढवली उत्सुकता; उन्हाळ्यात अनुभवता येणार

“मला टोळी-काटा फरक पडत नाही, मी स्वत:साठी खेळणार”; Ruchita Jamdar

Wagh Aala Marathi Rap: कोल्हापुराचा यंग रॅपर ‘ए किंग’चा हटके

Sonalee kulkarni वर कोसळला दुःखाचा डोंगर; भावाच्या निधनाने अभिनेत्री भावूक,

Khote Sikkay : हॉलीवूड ‘करी वेस्टर्न’ टाईप सिनेमाचा भारतीय अवतार!

Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा Tigheeचा ट्रेलर प्रदर्शित

Sai Tamhankar : “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील

Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

War : पोस्ट शेअर करत रितेश आणि जिनेलिया यांनी केले भारतीय सैन्याचे कौतुक

 War : पोस्ट शेअर करत रितेश आणि जिनेलिया यांनी केले भारतीय सैन्याचे कौतुक
मिक्स मसाला

War : पोस्ट शेअर करत रितेश आणि जिनेलिया यांनी केले भारतीय सैन्याचे कौतुक

by Jyotsna Kulkarni 09/05/2025

आता भारताने थेट त्यांच्याच घरात घुसून त्यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. ऑपरेशन सिंदुरननंतर पाकिस्तानने सीमारेषांवर गोळीबार सुरु केला. या गोळीबारामध्ये सीमारेषेजवळील अनेक लोकांचा मृत्यू झाला. तर जवान दिनेश कुमार शर्मा हे देखील शहीद झाले. पाकिस्तानच्या गोळीबाराला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची मागणी सर्वच स्तरातून होत असताना, भारताने देखील पाकला जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. (War)

भारताने थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत मजल मारली आहे. भारतीय फौजांनी ड्रोन आणि हवाई हल्ले पाकिस्तानवर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे इस्लामाबादेत नुसता हाहाकार माजला आहे. फक्त इस्लामाबादच नाही तर लाहोर, पेशावरसह पाकिस्तानातल्या १६ शहरांवर भारतानं जोरदार प्रतिहल्ला करत हाहाकार माजवला. भारताच्या या तुफान हल्ल्यामुळे पाकच्या अनेक शहरांमध्ये ब्लॅक आऊट ठेवण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे. (Ritesh and Genelia Deshmukh)

भारताने अचानक आणि भयानक केलेल्या या जोरदार प्रतिहल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये धमक्यांचे आवाज सतत येत आहे. जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये सीमेलगतच्या भागात ब्लॅकआउट करण्यात आला. भारताच्या या मोठ्या प्रतिकारामुळे समस्त भारतीयांनी आपल्या सैन्यावर, आपल्या जवानांवर गर्व व्यक्त करत त्यांचे कौतुक केले आहे. यात कलाकार देखील मागे नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जवानांसाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांचा जोश हिंमत वाढवण्यासाठी सर्वच लोकं विविध पोस्ट शेअर करताना दिसत आहे. (Marathi Latest News)

War

अशातच बॉलिवूड आणि मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय कपल अशी ओळख असलेल्या अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डिसुझा यांनी देखील त्यांच्या सोशल मीडियावरून एक खास पोस्ट शेअर करत आपल्या जवानांचा आत्मविश्वास वाढवला आहे. जिनिलियाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर खास संदेश लिहिला आहे. तर दुसरीकडे रितेश देशमुखने देखील त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मेसेज शेअर करत भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे. (Marathi Top News)

जिनिलिया डिसुझाची पोस्ट
जिनिलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्टमध्ये लिहिले, “आपल्या भारतीय सैन्याला त्यांच्या शौर्य, धाडस आणि धैर्यासाठी सलाम. आम्ही आपल्या सुरक्षिततेसाठी आणि यशासाठी प्रार्थना करतो. जय हिंद!”

रितेश देशमुखची पोस्ट
“खंबीरपणे उभे राहून, आपले रक्षण करणाऱ्या आपल्या राष्ट्राच्या खऱ्या हिरोंना सलाम भारतीय सैन्य जिंदाबाद! भारत माता की जय! जय हिंद!”

War

२२ एप्रिलला काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करत त्यांना गोळी मरून ठार केले. याचंच बदला म्हणून भारतीय सैन्यदलांनी ७ मे च्या मध्यरात्री पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव असलेल्या या एअर स्ट्राईकला भारतीय सेनेने यशस्वी करत सर्वच आतंकी हल्ल्याचा बदला घेतला आहे. (Marathi Trending News)

================================

हे देखील वाचा: Ind vs Pak conflict: “आपल्या देशाच्या खऱ्या हिरोंना सलाम”; कलाकारांनी केलं सैन्याचं कौतुक

=================================

भारताने केलेल्या या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या बुडाला आग लागली आणि त्यांनी सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन तर केले सोबतच ड्रोन हल्ले आणि गोळीबार देखील केला. पण, भारतीय सैन्याने देखील पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे. भारतीय सैन्यानं पाकिस्तानचे सगळे हल्ले परतवून लावले. भारतीय सैन्याच्या या अभूतपूर्व यशाला सगळ्यांनीच सलाम केला आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actors actress Bollywood bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured genelia deshmukh genelia deshmukh post india indian army pakistan riteish and genelia Riteish Deshmukh riteish deshmukh and genelia deshmukh riteish deshmukh post social media post ऑपरेश सिंदूर जिनेलिया देशमुख जिनेलिया देशमुख पोस्ट पाकिस्तान भारत रितेश देशमुख रितेश देशमुख पोस्ट सोशल मीडिया
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.