Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

जेव्हा अमिताभ बच्चन यांनी लहानग्या Kareena Kapoor हिचे पाय धुतले!

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची’ गोष्ट सांगणारा ‘घरत गणपती’ चित्रपटाचा भावस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित

 ‘प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची’ गोष्ट सांगणारा ‘घरत गणपती’ चित्रपटाचा भावस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित
Gharat Ganpati Movie Trailer
मिक्स मसाला

‘प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची’ गोष्ट सांगणारा ‘घरत गणपती’ चित्रपटाचा भावस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित

by Team KalakrutiMedia 13/07/2024

कोकणी माणसाचं आणि गणेशोत्सवाचं अजोड नातं आहे. ‘गणपती’ असा शब्दोच्चार जरी झाला तरी एक वेगळीच लहर कोकणी माणसाच्या मनाला स्पर्शून जाते. कोकणी माणसाला गणपतीत गावची ओढ लागण्याचं आणखी एक कारण कोकणवासी खरोखरच गोतावळा प्रिय असतो. नातेसंबंध जपण्यासाठी, पाहुणचारासाठी त्याची विशिष्ट अशी ओळख आहे. या सणाच्या निमित्ताने  नात्यांचे  बंध जपत  उत्सवाचा आनंद  द्विगुणीत करण्यासाठी याहून अनोखी संधी असूच शकत नाही.  याच गणपती उत्सवाच्या आनंददायी सोहळ्याचं आणि घरत कुटुंबातील नात्यांच्या बंधाची गोष्ट घेऊन ‘घरत गणपती’ हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने ‘घरत गणपती’ हा भव्य मराठी चित्रपट २६ जुलैला आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे असून कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचा भावस्पर्शी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.(Gharat Ganpati Movie Trailer)

Gharat Ganpati Movie Trailer
Gharat Ganpati Movie Trailer

‘प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची‘ ही गोष्ट असून नातेसंबंधांचा सुरेख गोफ या चित्रपटात विणला आहे. निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव,संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ.शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग,आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम अशी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत. नातेसंबंधातील  प्रेम, गोडवा सणांच्या माध्यमातून निश्चितच निर्माण होत असतो. हाच धागा घेऊन सर्वांगसुंदर अशी ‘लंबोदर’ कथा ‘घरत गणपती’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. कोकणातल्या एका सुखवस्तू कुटुंबातील ही गोष्ट आहे. घरातील गणपतीच्या निमित्ताने घरत कुटुंबात घडणाऱ्या सहज-साध्या गोष्टी, ज्यात गमतीजमती आहेत, राग-लोभ आहेत, एकमेकांविषयी वाटणारी माया आहे.

Gharat Ganpati Movie Trailer
Gharat Ganpati Movie Trailer

चित्रपटाला साजेशी चार गाणी चित्रपटात असून ‘माझा कोकण भारी‘ आणि ‘नवसाची  गौराई  माझी’ या गाण्यांना सोशल माध्यमावर उत्तम प्रतिसाद मिळतोय. श्रद्धा दळवी, समीर सामंत,अलोक सुतार यांनी लिहिलेल्या गीतांना जावेद अली, विशाल ददलानी, अभय जोधपूरकर, सायली खरे, ‘द कोकण कलेक्टिव्ह’ गर्ल्स यांनी स्वरबद्ध केलं आहे या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी रुपेरी पडद्यावर उत्तम कथानक व भव्यदिव्यता दिसेल असा विश्वास व्यक्त करताना नात्यांचा हा प्रवास प्रत्येकाला समृद्ध करेल, असं दिग्दर्शक नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांनी सांगितलं.(Gharat Ganpati Movie Trailer)

=================================

हे देखील वाचा: सई ताम्हणकर,अंकुश चौधरी,स्वप्नील जोशी ‘पुन्हा दुनियादारी’च्या निमित्ताने अकरा वर्षांनंतर एकत्र येणार

=================================

पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने ‘घरत गणपती’.  नॅविअन्स स्टुडिओ निर्मित या चित्रपटाच्या वर्ल्ड वाइड वितरणाची जबाबदारी पॅनोरमा स्टुडिओजने सांभाळली आहे तसेच चित्रपटाच्या म्युझिकची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे. ‘घरत गणपती’ हा भव्य मराठी चित्रपट २६ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.  

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood Celebrity Celebrity News Entertainment Gharat Ganpati Movie Trailer Marathi Movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.