Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

‘मुक्काम पोस्ट ठाणे’ या आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित राजकीय चरित्रपटाचे जागतिक डिजिटल प्रीमियर
ZEE5 या एतद्देशीय व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि बहुभाषिक कथा सादर करणाऱ्या प्लॅटफॉर्मला ‘धर्मवीर 2 – मुक्काम पोस्ट ठाणे’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाचे जागतिक डिजिटल प्रीमियर सादर करताना आनंद होत आहे. या राजकीय चरित्रपटात शिवसेना नेते आनंद दिघे यांची असामान्य गोष्ट पाहायला मिळणार आहे. ‘वारसाची मशाल हाती असलेले’ अशी त्यांची ओळख आहे. प्रसाद ओक आणि क्षितिश दाते यांनी दिघे यांची गोष्ट आपल्या दमदार अभिनयातून जिवंत केली असून क्षितिश यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसतील. प्रवीण तरडे यांचे दिग्दर्शन आणि झी स्टुडिओ व साहिल मोशन आर्ट्स यांची निर्मिती असलेला हा बहुप्रतीक्षीत सिक्वेल ZEE5 वर स्ट्रीम केला जात आहे.(Dharmveer 2 On zee5)

‘धर्मवीर 2’ची गोष्ट पहिल्या सिनेमाच्या शेवटापासून पुढे सुरू होते. त्यामध्ये कोणत्या प्रमुख घटकांमुळे एकनाथ शिंदे 2022 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडले होते ते दाखवण्यात आलं होतं. या सिनेमात राजकीय निष्ठा आणि महत्त्वाकांक्षेची आव्हानं, दिघे यांचे वारसदार या नात्याने शिंदे यांचा प्रवास आणि राजकीय पटलावरीर आव्हानांतून मार्ग काढताना आलेली आव्हानं पाहायला मिळतं. महेश लिमये यांची देखणी सिनेमेटोग्राफी आणि श्रवणीय संगीतामुळे हा सिक्वेल आजच्या प्रेक्षकांना आपलीशी वाटणारी आणि आनंद दिघे यांच्या वारशाचा सन्मान करणारी गोष्ट दाखवणारा आहे.(Dharmveer 2 On zee5)
===========================
हे देखील वाचा: Phullwanti Trailer: दमदार कथा,उत्कृष्ट निर्मितीमूल्य आणि नृत्य- संगीताचा नेत्रसुखद अविष्कार… ‘फुलवंती’
===========================
दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले, ‘धर्मवीर सिनेमाचा सिक्वेल तयार करण्याची संधी मिळणं हा समृद्ध करणारा प्रवास होता. चरित्रपट तयार करणं हे एक सुंदर आव्हान असतं आणि मी तो करताना आनंद दिघे व एकनाथ शिंदे यांच्या व्यक्तीमत्त्वांशी खऱ्या अर्थाने प्रामाणिक राहात खिळवून ठेवणारी गोष्ट सांगण्याचं ध्येय ठेवलं होतं. प्रेक्षकांकडून मिळालेलं प्रेम खऱ्या अर्थाने समाधान देणारं आहे. प्रसाद ओक आणि क्षितिश दाते यांनी केलेली मेहनत, त्यांचा ध्यास आणि अभिनय कौतुकास्पद आहे. या सिनेमानं इतिहास घडवला. ZEE5 वर त्याचे प्रीमियर होत असून हा प्रवास जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी उत्सुक आहे. प्रेक्षकांचं हे प्रेम यापुढेही वृद्धींगत होत राहील, अशी मला आशा वाटते.’’