
Gram Chikitsalay : आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजतेय ग्रामीण जीवनाची सीरीज!
सध्या दर्जेदार चित्रपटांसोबतच वेब सीरीज देखील प्रदर्शित होत आहेत. शहरी भागातील जीवन, संस्कृतीसोबतच ग्रामीण जीवन आणि तेथील लोकांची मानसिकता, परंपरा यावरही भर टाकणाऱ्या अनेक सीरीज भेटीला येत आहेत. अॅमेझॉन प्राईमवर पंचायत ही वेब सीरीज विशेष चर्चेत असून आता या पाठोपाठ आणखी एक वेब सीरीज जगात चर्चेत आहे. राहूल पांडे दिग्दर्शित ‘ग्राम चिकित्सालय’ ही वेब सीरीज सध्या विशेष चर्चेत असून यात ग्रामीण भागातील कटू सत्य विनोदी अंगाने मांडण्यात आलं आहे.(Bollywood)

‘ग्राम चिकित्सालय’ सीरीजच्या कथेमध्ये ग्रामीण आरोग्य सेवा व्यवस्थेतील तुटफूट, मानसिक आरोग्यविषयी जागरूकता आणि शहरी व ग्रामीण संघर्षामधील फरक अत्यंत प्रभावीपणे मांडले गेले आहेत. ही सीरीज एका काल्पनिक उत्तर भारतीय गावातील ‘भटकंडी’ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर घडते. गावातील दैनंदिन घडामोडी, मोडकळीस आलेली व्यवस्था, आणि गावकऱ्यांच्या आरोग्याशी संबंधित संघर्ष, विनोदाच्या मदतीने मांडले गेले आहेत. (Web series)
=====================================
हे देखील वाचा: ‘वामा लढाई सन्मानाची’ चित्रपटातील Kailas Kher यांच्या आवाजातील टायटल साँग प्रदर्शित…
=====================================
‘ग्राम चिकित्सालय’ सीरिजमध्ये अमोल पराशर, विनय पाठक यांची प्रमुख भूमिका असून दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, TVF च्या याआधी रिलीज झालेल्या इतर सीरिजप्रमाणेच ही नवी सीरिजही प्रेक्षकांना मातीशी जोडून ठेवणारी आहे.