Kiran Mane किरण मानेंची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीदिनी खास पोस्ट
H. S. Rawail : ‘या’ चित्रपटाचे गीतकार आनंद बक्षी कसे झाले?
दिग्दर्शक एच एस रवैल (H. S. Rawail) यांनी १९६३ साली ‘मेरे मेहबूब’ (Mere Mehboob) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. मुस्लिम सोशल मूवी ‘मेरे मेहबूब’ जबरदस्त हिट झाला होता. मुस्लिम तहजीब, नवाबी वातावरण, अप्रतिम सुरीलं संगीत, कलात्मक दिग्दर्शन आणि कलावंतांचा अप्रतिम अभिनय यामुळे हा चित्रपट सुपर हिट झाला. या चित्रपटाची गाणी शकील बदायुनी यांनी लिहिलेली होती तर संगीत Naushad यांचे होते.
यानंतर एच एस रवैल (H. S. Rawail) यांनी ‘संघर्ष’ (१९६८) चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाची गाणी देखील Shakeel Badayuni यांनी लिहिलेली होती आणि संगीत नौशाद यांचे होते. ‘संघर्ष’ या चित्रपटात Dilip Kumar, वैजयंतीमाला, संजीव कुमार, बलराज सहानी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपटदेखील यशस्वी झाला. यानंतर एच एस रवैल यांनी पुढच्या महत्त्वाकांक्षा सिनेमाची तयारी सुरू केली. हा सिनेमा होता ‘मेहबूब की मेहंदी’(Mehboob Ki Mehndi).
तेव्हा राजेश खन्ना हे चलनी नाणे होते. rajesh khanna, लीना चंदावरकर, प्रदीप कुमार यांना घेऊन या चित्रपटाच्या सुरुवात केली. रवैल यांचा आवडता गीतकार शकील बदायुनी मात्र या सिनेमाच्या वेळी हयात नव्हते. त्यांचे २० एप्रिल १९७० रोजी निधन झाले होते. त्यामुळे या ‘मेहबूब कि मेहंदी‘ या सिनेमाची गाणी मजरूह सुलतानपूरी यांना लिहायला दिली. त्यांनी चित्रपटाला साजेशा थीम सॉंगच्या पहिल्या दोन ओळी लिहून काढल्या. एच एस रवैल यांना त्या खूप आवडल्या. चित्रपटाचे संगीतकार नौशाद होते. मजरूह आणि नौशाद खूप वर्षानंतर एकत्र येत होते त्यांचा ‘साथी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता.
‘मेहबूब की मेहंदी’ या चित्रपटाच्या थीम सॉंगच्या दोन ओळी लिहिल्यानंतर मजरूह सुलतानपूरी साहेब रशियाला निघून गेले आणि तिथे त्यांचा मुक्काम तीन-चार महिने होता. या काळात इकडे एच एस रवैल (H. S. Rawail) यांना मात्र चित्रपट लवकर पूर्ण करण्याची घाई होती. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या एका गीतकाराला घेऊन नौशाद यांना चित्रपटाची गाणी स्वरबद्ध करायला सांगितले. परंतु नौशाद यांनी सांगितले, ”आपल्याला असं करता येणार नाही. त्यासाठी मजरूह सुलतानपूरी यांची लिखित परवानगी आपल्याला घ्यावी लागेल.” परंतु रवैल यांनी मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष केले आणि त्यांनी नौशाद यांनाच चित्रपटापासून बाजूला केले! आणि त्यांच्या जागी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची वर्णी लागली.
============
हे देखील वाचा : Pran : प्राण यांच्या हिंदी सिनेमातील प्रवेशाचा भन्नाट किस्सा!
============
आता त्यांच्यासोबत गीतकार म्हणून आनंद बक्षी आले आणि त्यांनी चित्रपटाची गाणी लिहिली. गाणी रेकॉर्ड देखील झाली. चार महिन्यानंतर जेव्हा मजरूह सुलतानपूरी भारतात परत आले तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की आपल्याला कुठली सूचना न देता आपल्याला चित्रपटातून काढून टाकले आहे आणि आपल्या जागी दुसऱ्या गीतकाराला घेतले आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ रायटर्स असोसिएशनकडे एच एस रवैल यांच्या विरोधात तक्रार केली. असोसिएशनने या दोघांच्याही बाजू ऐकून घेतल्या आणि रवैल (H. S. Rawail) यांना दोषी ठरवत दंड म्हणून माफीनामा आणि त्यांना काही पैसे मजरूह सुलतानपूरी यांना द्यायला सांगितले. अशा पद्धतीने मजरू सुलतानपुरी यांनी या चित्रपटाची गाणी न लिहिता त्यांना चित्रपटाचे मानधन मात्र मिळाले!