Manoj Kumar : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘भारत’ काळाच्या पडद्याआड

मम्मा करीनासाठी तैमूरने तयार केला खास नेकलेस, करीनाने पोस्ट केला फोटो…
करोनाच्या संकटामुळे अभिनेत्री करीना कपूर, पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूरसोबत घरातच आहे.
नेहमी आपल्या शुटिंगमुळे व्यस्त असलेल्या करीनाला आपल्या मुलासोबत वेळ घालवायला मिळतो आहे.
या लॉकडॉउनच्या काळात करिना, सैफ आणि तैमुर घरात काय काय करत असतात याचे फोटो ती स्वतः तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत असते. हा लॉकडॉउनचा काळ करीना आणि तैमुर एकमेकांबरोबर आनंदाने घालवत आहेत.
तैमुरने यावेळी करीनासाठी चक्क पास्ताचा नेकलेस तयार केला आहे. हा नेकलेस घालून करीनाने आपला फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
याआधी करीनाने तैमुरने काढलेल्या सुंदर चित्राचा फोटो देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला होता. एकप्रकारे लहान वयातच तैमुरच्या कलेला प्रोत्साहन देऊन करीना आदर्श आईचे कर्तव्य पार पाडत आहे.