Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Dharmendra यांच्या शेवटच्या चित्रपटाचं पोस्टर रिलीज; चाहते झाले भावुक

बॉलिवूडचा He-Man हरपला; ज्येष्ठ महान अभिनेते Dharmendra यांचं ८९व्या वर्षी

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Teaser:  शाळेच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

120 Bahadur : फरहान अख्तरकडून खूप अपेक्षा होती पण…

‘संगीत देवबाभळी’ फेम Shubhangi Sadavarte पुन्हा अडकणार लग्नबंधनात; 3 महिन्यांआधीच झाला

घराला लागलेल्या भीषण आगीतून ‘या’ व्यक्तीमुळे वाचला Shiv Thakare चा जीव !

Talat Mahmood : है सबसे मधुर वो गीत जिन्हे हम

Natraj Studio : चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा घटक

Madhuri Dixit हिच्या ‘मिसेस देशपांडे’ वेबसीरीजची पहिली झलक आली समोर

स्मृती मंधनाचा होणारा नवरा Palash Muchhal आहे तरी कोण?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

बॉलिवूडचा He-Man हरपला; ज्येष्ठ महान अभिनेते Dharmendra यांचं ८९व्या वर्षी निधन

 बॉलिवूडचा He-Man हरपला; ज्येष्ठ महान अभिनेते Dharmendra यांचं ८९व्या वर्षी निधन
मिक्स मसाला

बॉलिवूडचा He-Man हरपला; ज्येष्ठ महान अभिनेते Dharmendra यांचं ८९व्या वर्षी निधन

by रसिका शिंदे-पॉल 24/11/2025

हिंदी चित्रपटसृ्ष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण धर्मेंद्र सिंग देओल (Dharmendra) यांचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन झालं… गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होतेच… अखेर २४ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. बॉलिवूडचे He Man धर्मेंद्र यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे… फिल्म मेकिंगमधील ब्लॅक अॅंड व्हाईट ते अगदी आधुनिक तंत्रज्ञानापर्यंतचा ड्रास्टिक चॅंड पाहणाऱ्या धर्मेंद्र यांनी प्रेक्षकांना आपल्या जाळ्यात ओढून घेतलं होतं ते कायमचच…

८९व्या वर्षी देखील अगदी तरुण कलाकारांना लाजवेल असे हॅंडसम धर्मेंद्र तितकाच उत्साह आणि ऊर्जा भूमिका साकारताना दाखवत होते… २०२४ मध्ये तेरी बातों में ऐसा उलझा जिया या चित्रपटात त्यांनी शेवटचा अभिनय केला… म्हणतात ना की कलाकार शेवटच्या श्वासापर्यंत केवळ अभिनय करण्यासाठीच धडपडत असतो… ही फ्रेज धर्मेंद्र खऱ्या अर्थाने जगले यात शंकाच नाही… १९६० ते २०२४ असा ६५ वर्षांचा इंडस्ट्रीतला धर्मेंद्र यांचा प्रवास उल्लेखनीय होता… एकेकाळी सर्वात महागडा सुपरस्टार असणाऱ्या धर्मेंद्र यांच्या फिल्मी प्रवासावर एक नजर टाकूयात… (Entertainment News)

८ डिसेंबर १९३५ मध्ये पंजाबमधील शिक्षकी कुटुंबात धरम पाजींचा जन्म झाला… किशन सिंग देओल आणि पत्नी सतवंत कौर यांना झालेल्या या पुत्राने अभिनयातच करिअर करण्याचं पक्क केलं होतं… वडिल शिक्षक असले तरी अभ्यासाची गोडी धर्मेंद्रंना कधीच नव्हती… लहानपणापासून अभिनेता होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या धर्मेंद्र यांना आपलं ते स्वप्न आईमुळे पुर्ण करता आलं… आईच्या पाठिंब्यामुळे पंजाब ते मुंबई असा प्रवास धर्मेंद्र यांनी केला.. धर्मेंद्र यांनी एका मुलाखतीत एकदा सांगितलं होतं की, “चित्रपटात करिअर करण्यापू्र्वी मी गॅरेजमध्ये राहायचो… माझ्याकडे मुंबईत राहण्यासाी तेव्हा घर नव्हतं… तेव्हा एका ड्रिंलिंग फर्ममध्ये काम करायचो आणि त्यावेळी महिन्याला २०० रुपये पगार मिळायचा… अजून पैसे मिळवायला ओव्हरटाईम करायचो… पण मन चित्रपटाकडेच होतं…” अखेर त्यांच्या कष्टाला फळ मिळालं आणि अखेर १९६०मध्ये अर्जुन हिंगोरानी यांच्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मनोरंजन करत त्यांनी प्रेक्षकांचा हात घट्ट पकडून ठेवला… (Dharmendra News)

रोमॅंटिक चित्रपटांसोबतच अॅक्शनही करणाऱ्या धर्मेंद्र यांना १९६६ मध्ये रिलीज झालेल्या ‘फूल और पत्थर’ चित्रपटामुळे अ‍ॅक्शन हिरोचा टॅग लागला… मग काय बॉलिवूडच्या या He Man ने त्यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही… ‘बंदिनी’, ‘सूरत और सीरत’, ‘शोले’, ‘आझाद’, ‘माँ’, ‘अंधा कानून’, ‘गुलामी’, ‘हिंमतवार’,’साजिश’, ‘राम बलराम’, ‘दो दिशायें’, ‘खतरों कें खिलाडी’, ‘नफरत की आंधी’, ‘दुश्मन देवता’, ‘अपने’, ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारत स्वत:चा ऑरा जपला…(Dharmendra Movies)

================================

हे देखील वाचा : Dharmendra :“कधी सुटका मिळणार या गैरसमजांमधून?; धर्मेंद्रंची पोस्ट व्हायरल

================================

धर्मेंद्र यांची आणखी एक खासियत म्हणजे त्यांनी कधीच स्त्री प्रधान अर्थात Female Centric चित्रपटांना नकार दिला नाही… कारकिर्दिच्या सुरुवातीला त्यांनी अभिनेत्री नुतन यांच्यासोबत ‘सुरत और सीरत’ हा चित्रपट केला होता, ज्यात मेन हिरोईन नुतन यांच्यावर कथेचा पुर्ण फोकस होता… याशिवाय, ‘बंदिनी’, ‘सीता और गीता’ असे बरेच स्त्री प्रधान चित्रपट त्यांनी केले आणि आपल्या भूमिकेतून कथेला न्याय दिला…. संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या परिपक्व अभिनयाने समृद्ध करणाऱ्या He Man धर्मेंद्र यांना कलाकृती मीडियातर्फे भावपूर्ण आदरांजली….

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: bollywood update Dharmendra dharmendra death Entertainment he-man of bollywood
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.