Heeramandi फेम शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश
नुकताच OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स वर ‘हीरामंडी‘ या वेबसिरिज मध्ये झळकलेला अभिनेता शेखर सुमन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी अभिनेता शेखर सुमन साध्या पांढऱ्या रंगाच्या प्रिंटेड शर्टमध्ये पहायला मिळाले. एएनआय या वृत्तसंस्थेने शेखर सुमन यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे या अभिनेत्याचे पक्षात स्वागत करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये अभिनेता शेखर सुमन खूप आनंदी ही दिसत आहे.(Heeramandi Fame Shekhar Suman Joins BJP)
विशेष म्हणजे शेखर सुमन सध्या ‘हीरामंडी‘ या वेबसिरिजमुळे खुप चर्चेत आहे. यामध्ये अभिनेता लाहोरच्या नवाबच्या भूमिकेत आहे, ज्यात त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक ही होतोना पहायला मिळत आहे. वेबसिरिजच्या यशानंतर भाजपमध्ये प्रवेश करणे, तेही लोकसभा निवडणुकीच्या वेळी ही खरंतर मोठी गोष्ट आहे.’हीरामंडी‘ वेबसिरिजमुध्ये शेखर सुमनचं मन मलिका जानसोबत होतं. ही तीच मलिका जान आहे जी संपूर्ण ‘हीरामंडी’चे म्हणजेच मनीषा कोईराला चे प्राण होते.
या चित्रपटातील शेखरचा एक अॅडल्ट सीन चर्चेत होता. याबाबत झूमशी बोलताना अभिनेता म्हणाला की ‘हा सीन चित्रपटाच्या मूळ कथेचा भाग नव्हता. पण जेव्हा संजय लीला भन्साळी यांनी सेटवर या सीनबद्दल सांगितलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. अभिनेत्याने सांगितले की, त्याने हा सीन एका टेकमध्ये केला होता, ज्यामुळे तेथे उपस्थित सर्वजण खूप प्रभावित झाले होते. काही दिवसांपूर्वी ‘अनुपमा‘ फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रुपाली गांगुली या आधीपासूनच भाजप आणि पंतप्रधान मोदींच्या समर्थक आहेत.(Heeramandi Fame Shekhar Suman Joins BJP)
=================================
=================================
यावेळी अभिनेत्रीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते की, भाजप चांगले काम करत आहे म्हणूनच तिने पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रुपाली गांगुली पत्रकार परिषदेत म्हणाल्या होत्या की, ‘एक नागरिक म्हणूनही आपण सर्वांनी यात सहभागी व्हायला हवं. मला त्यांची काळजी आहे आणि जेव्हा मी विकासाचा हा महायज्ञ पाहतो तेव्हा मला वाटते की माझ्याबरोबर का सामील होऊ नये.’