Hema Malini to Rekha : बॉलिवूडच्या ‘या’ स्टार्सना सरकारही देतंय

Hema Malini to Rekha : बॉलिवूडच्या ‘या’ स्टार्सना सरकारही देतंय पगार!
गेल्या अनेक दशकांपासून बॉलिवूड कलाकार उत्कृष्ट चित्रपट, भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे… पण काही असे बॉलिवूडचे टॉपचे कलाकार आहेत जे चित्रपटांमध्ये कामं करत असताना सरकारी पदांवर कार्यरत आहेत.. जाणून घेऊयात अशा कलाकारांना ज्यांना आता पगार मिळतोय किंवा आयुष्यभरासाठी पेन्शन मिळतेय….
हिंदी चित्रपटसृष्टीची ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी (Hema Malini) उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबतच एक राजकारणी आहे. मथुरा येथून भाजपच्या लोकसभा खासदार असून त्यांना सरकारकडून पगार मिळतो… ‘शोले’, ‘सीता और गीता’, ‘कैदी’, ‘शरारा’, ‘युद्ध’, ‘आंधी-तुफान’, ‘जमाई राजा’, ‘बागबान’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली आहेत…

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे माजी खासदार (भाजप/टीएमसी) राहिले असून खासदार या पदावर कार्यक्रत असून त्यांना पेन्शन मिळते… आजवर त्यांनी १०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये कामं केली आहेत… ‘नसीब’, ‘ज्वालामुखी’, ‘तकदीर’, ‘इल्जाम’, ‘शान’, ‘काला पत्थर’, ‘मुकाबला’, ‘मगरुर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री किरण खेर (Kirron Kher) या चंदीगड येथून भाजपच्या लोकसभा खासदार असून सध्या त्या लोकसभा खासदार म्हणून सरकारकडून पगार घेत आहेत…’वीर झारा’, ‘सरदारी बेगम’, ‘मै हु ना’, ‘देवदास’, ‘मंगल पांडे’, ‘ओम शांती ओम’, ‘दोस्ताना’, ‘सिंग इज किंग’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्या झळकल्या आहेत…

ज्येष्ठ अभिनेत्री आणि राजकारणी जया बच्चन (Jaya Bachchan) सध्या समाजवादी पक्षाकडून राज्यसभेच्या खासदार असून त्यांना राज्यसभेतून पगार मिळतो… ‘शोले’, ‘गुड्डी’, ‘उपहार’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘एक नजर’, ‘कोशीश’, ‘परिचय’, ‘कोरा कागज’, ‘चुप चुपके’ अशाी अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली आहेत.

रवी किशन (Ravi Kishan) हे भोजपुरी सुपरस्टारसोबत गोरखपूरचे भाजपचे लोकसभा खासदार आहेत. त्यांना सध्या सरकारकडून पगार आणि भत्ता मिळतो. ‘अन्गी मोर्चा’, ‘किमत’, ‘तन्नु वेड्स मन्नु’, ‘लापता लेडिज’, ‘सन ऑफ सरदार २’, ‘मनी है तो हनी है’, ‘आर्मी’, ‘लक’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली आहेत.

‘रामायण’ मालिकेतील सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) या माजी भाजप खासदार असून त्यांना आता पेन्शन मिळते.

बॉलिवूडची एव्हरग्रीन क्वीन रेखा (Rekha) या माजी राज्यसभा खासदार होत्या. माजी राज्यसभा खासदार असल्यामुळे त्यांना आता पेन्शन मिळते… ‘धर्मात्मा’, ‘वो मै नही’, ‘सिलसिला, ‘घर’, ‘संसार’, ‘सुहाग’, ‘खुबसूरत’, ‘जीवन धारा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली आहेत.
