
Hera Pheri 3 : बाबू भैय्या नंतर श्यामचीही हेरा फेरीतून एक्झिट?
बॉलिवूडमधील कॉमेडी चित्रपटांच्या यादीतील कल्ट चित्रपट म्हणजे ‘हेरा फेरी’ (Hera Pheri). श्याम, बाबू भैय्या आणि राजू ही तीन पात्र प्रेक्षकांच्या नसानसांत अगदी भिनली आहे. ‘हेरा फेरी’ चित्रपटाच्या यशानंतर चित्रपटाचा दुसरा भाग आला होता. आणि आता लवकरच हेरा फेरी ३ अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, काही कारणामुळे परेश रावल (Paresh Rawal) अर्थात बाबू भैय्या यांनी हेरा फेरी ३ चित्रपटातून माघार घेतल्याचं समोर आलं असताना आता सुनील शेट्टीने देखील ‘हेरा फेरी ३’ बद्दल महत्वाचं विधान केलं आहे. (Bollywood)
सध्या, सुनील शेट्टी (Suneil Shetty) सध्या त्यांच्या आगामी ‘केसरी वीर’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘हेरा फेरी ३’ बद्दल बोलताना त्याने अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्यासोबत काम करायला खूप आवडतं असं म्हटलं. बॉलीवूड बबलशी बोलताना हेरा फेरी चित्रपटाबद्दल सुनील म्हणाला की, मी मल्टीस्टारर चित्रपटांमध्ये काम करण्यास नेहमीच उत्सुक असतो. तुम्हाला अशा भूमिका साकारण्याची संधी कुठे मिळते? तुम्हाला अशा भूमिका किती वेळा मिळतात? खूप क्वचितच.”(Entertainment)

सुनील पुढे म्हणाला, ‘जेव्हा हेरा फेरीचा विचार येतो तेव्हा, जर त्यात बाबू भैया (परेश रावल) आणि राजू (अक्षय कुमार) नसतील, तर श्यामच(सुनील शेट्टी) अस्तित्वच नाही. त्याला काही अर्थ नाही. तुम्ही त्यापैकी एकाला काढून टाकलं तरी चित्रपट चालणार नाही.”(Bollywood breaking news)
================================
हे देखील वाचा: Ott Relelease May 2025 :या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?
=================================
त्यामुळे हेरा फेरीत जर का बाबू भैय्या, श्याम ही पात्रचं नसतील तर एकटा राजू करणार काय आणि हेरा फेरी कशी होणार? आता हेरा फेरी ३ चित्रपट येणार का? आणि त्यात परेश रावल, सुनील शेट्टी नसले तर त्यांच्या जागी कोण असणार किंवा त्यांनाच पुन्हा घेणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.(Bollywood trending news)