Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

हार्दिक-वीणाचा रंगला लग्नसोहळा!; Aranya मधील धमाकेदार गाणं प्रदर्शित

Shakti Samanta : हिट सिनेमांचा सुपरहिट दिग्दर्शक

Pallavi Joshi यांनी मराठी जेवणाबाबतच्या विवेक अग्निहोत्रींच्या त्या विधानावर केली

Nagraj Manjule : शाळेत असतानाच लागलेलं दारुचं व्यसन पण….; नागराज

“नवोदित कलाकार कसा मोठा होणार?”, Siddhant Sarfareचा Prasad Oakला प्रश्न;

हॉलीवूडची कॉपी केल्यामुळे ‘या’ हिंदी सिनेमाच्या सर्व प्रिंट्स कोर्टाने संपूर्णपणे

Jr NTR ‘वॉर २’ चित्रपटानंतर या दोन चित्रपटांमध्ये झळकणार!

Amol Palekar यांनी राजेश खन्ना यांना नरभक्षक अभिनेता का म्हटलं?

Priya-Umesh यांची ‘बिन लग्नाची गोष्ट’साठी निवड झाली तरी कशी?

Jayashree Gadkar : एका फोटोमुळे कसं बदललं जयश्री यांचं आयुष्य?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

ह्यांचा उल्लेख नेहमी ‘फ्लॉप सिनेमाचा हिट संगीतकार’ असा होतो! का…?

 ह्यांचा उल्लेख नेहमी ‘फ्लॉप सिनेमाचा हिट संगीतकार’ असा होतो! का…?
अनकही बातें कलाकृती तडका

ह्यांचा उल्लेख नेहमी ‘फ्लॉप सिनेमाचा हिट संगीतकार’ असा होतो! का…?

by धनंजय कुलकर्णी 14/07/2020

आप की नजरोने समझा प्यार के काबील मुझे..

संगीताचा दुनियेत काही संगीतकारांच्या जोड्या प्रतिथयश नायकांसोबत जोडल्या गेल्या होत्या. जसे दिलीपकुमार करीता नौशाद अली, राज कपूर करीता शंकर जयकिशन तर देव करीता सचिनदा असं समीकरण जुळलं गेलं. ज्या संगीतकारांच्या नशीबी असा यशस्वी नायक नसायचा त्यांचा स्ट्रगल आणखी कठीण होत होता. मोठे बॅनर, यशस्वी कलाकार या संगीतकारांना फारसे कधी मिळालेच नाहीत. यातच एक नाव होतं संगीतकार मदनमोहन. त्याला बिचार्‍याला गुणवत्ता असूनही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच सिनेमांना व्यावसायिक यश मिळालं. त्यामुळे मदन मोहनचा उल्लेख नेहमी ‘फ्लॉप सिनेमाचा हिट संगीतकार’ असा होतो! पण तरीही मदनमोहनने फक्त क्वालिटी म्युझिकच दिलं. सिनेमाच्या व्यावसायिक अपयशाचा त्याच्या गुणवत्तेवर काहीच परीणाम झाला नाही.

बॉम्बे टॉकीजच्या व नंतर फिल्मिस्तानच्या राय बहादूर चुनीलाल यांचा सुपुत्र असलेला मदन मोहन सिनेमात येण्यापूर्वी लष्करात होता. पण काही वर्षातच तो सिनेमात आला. ख्यातनाम गझल गायिका बेगम अख्तर यांच्या गायकीचा त्याच्यावर पगडा होता. पुढे मदनने जे गजलांचं साम्राज्य उभं केलं त्याला ही पार्श्वभूमी होती. शास्त्रीय संगीताचा सुरेल वापर आणि अचूक वाद्यांची निवड ही त्यांची खासीयत होती. लताच्या स्वराचा अप्रतिम वापर मदनने फार सुंदर रितीने करून घेतला. ’लता अ‍ॅंड मदनमोहन वेअर ऑफकोर्स म्युझिकली मेड फॉर इच अदर’ असं राजू भारतन म्हणतो ते उगाच नाही. १९७३ साली लताने लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉल मध्ये जो कार्यक्रम केला होता त्यात मदनच्या संगीतात गायलेल्या ’लग जा गले’ आणि ’खेलो ना मेरे दिल से’ या दोन गाण्यांचा समावेश केला होता. त्या वेळी तिथला म्युझिक कंडक्टर एड वेल्च या गाण्याच्या मेलडी आणि वाद्यांच्या वापराने प्रभावित झाले होते. बेगम अख्तर त्याच्या ’कदर जाने ना मेरा बालम बेदर्दी’ हे गाणे ऐकून एवढ्या खूष झाल्या की लखनौ हून त्यांनी मदनला ट्रंककॉल करून तब्बल २० मिनिटे या गाण्यावर भरभरून बोलल्या. लताच्या स्वरावर त्याची एवढी श्रध्दा होती की एकाच सिनेमातील तीन वेगवेगळ्या नायिकांना (चित्रपट: भाई भाई) लताचाच स्वर वापरला.

’देख कबीरा रोया’ या सिनेमात ‘अश्को से तेरी हमने तसवीर बनाई है, तू प्यार करे या ठुकराये, मेरी वीणा तुम बिन रोये’ या त्रयी गीताचा नवा प्रकार सुरू केला. लता, आशा, मीना आणि उषा या चार मंगेशकर भगीनींना घेवून ’जहांआरा’ या सिनेमासाठी एक कव्वाली बनवली होती पण काही कारणाने सिनेमातून वगळली गेली. याच सिनेमातील सर्व गाणी म. रफीने गावी असा निर्मात्याचा आग्रह होता पण मदनला तलतचा स्वर हवा होता. शेवटी तलतच्या आवाजातच गाणी रेकॉर्ड झाली. ‘तेरी आंख के आंसू पी जाउं, फिर वही शाम वही गम वही तन्हाई है, मै तेरी नजर का सुरूर हूं, ऐ सनम आज ये कसम खाले’ ही तलतची अप्रतिम गाणी यात होती. असाच काहिसा प्रकार लैला मजनू (१९७५) च्या वेळी झाला होता. नायक ऋषी कपूर करीता किशोरचा स्वर निर्मात्याला हवा होता पण मदनने गाण्याच्या प्रकृतीला साजेसा रफीचा स्वर घेतला. मदनमोहन प्रयोगशील संगीतकार होता. त्यांच्या गाण्यातील इंटरल्यूड मधील म्युझिक पीसेस अतिशय सुंदर असायचे (आठवा ’हंसते जख्म’ मधील ’तुम जो मिल गये हो’). पारितोषिकांनी मात्र त्याला कायमच हुलकावणी दिली. १९६४ साली ’वो कौन थी’ साठी त्यांना फिल्म फेअरचे नॉमिनेशन मिळाले होते (पण परितोषिक ’दोस्ती’ साठी एल पी ला मिळाले!).१९७१ सालच्या ’दस्तक’ (बैंया ना धरो, माई रे मै कासे कहूं) या सिनेमा साठी मात्र त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांच्या संगीतात उस्ताद विलायत खान, उस्ताद अली अकबर खान, पं. रामनाराय़ण, पं. शिवकुमार शर्मा, पं. हरीप्रसाद चौरसिया या दिग्गजांनी हजेरी लावून संगीत आणखी समृध्द केले. आज १४ जुलै मदनमोहन यांचा ४५ वा स्मृती दिन, त्या निमित्ताने या महान कलावंताचे स्मरण!

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat Bollywood Music Bollywood Topics bollywood update Celebrity Celebrity Birthday Celebrity News Celebrity Talks Entertainment Indian Cinema movies music Music composer
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.