
Holi Special : होळी, पुरणाचीपोळी आणि ट्रेण्डींग गाणी…!
“आला होळीचा सण लय भारी चल नाचूया…” होळीच्या सणाची वाट लहान मुलांसपासून ते अगदी वयोवृद्धापर्यं सगळेच पाहात असतात. होळीच्या रंगात रंगण्यासाठी आणि थकून पुरणपोळीवर ताव मारण्यासाठी आतुरतेने हा सम कधी येईल याची चर्चा असतेच. होळीचा दिवस आणि होळी स्पेशल खास चित्रपटातील गाणी कायमच ट्रेण्डींग असतात. होळीचा सण अनेक चित्रपटांमधूनही दाखवला जातो. होळीच्या निमित्ताने जाणून घेऊयात हिंदीतील काही खास होळी स्पेशल चित्रपटांतील गाणी…. (Holi Special songs)
वक्त : रेस अगेंन्स्ट टाईम
अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा, अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘वक्त’ या चित्रपटात ‘लेट्स प्ले होली’ या गाण्यातून रंगाची उधळण करत होळीचा सण चित्रित केला गेला आहे. २००५ साली आलेल्या या चित्रपटात बाप आणि मुलाची एक अनोखी कथा मांडण्यात आली आहे. (Holi festival)

रांझना
सोनम कपूर, धनुष, अभय देओल यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘रांझना’ या चित्रपटात वाराणसीमध्ये होळी कशी साजरी केली जाते याचं दृश्य दिसतं. घाटावर होळी फार वेगळ्या आणि पारंपारिक पद्धतीने आजही साजरी करतात आणि त्याचं उत्तम चित्रिकरण ‘तुम तक’ या गाण्यातून केलं गेलं आहे. (Trending festival songs)

वेदा
जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ यांच्या ‘वेदा’ चित्रपटातील ‘होलीया’ हे गाणं गुजराज,राजस्थानमधील होळी कशी असते, उल्हासाच्या वातावरणात धुळवड तिथे कशी साजरी करतात याचं रंगीबेरंगी चित्रिण गाण्यातून दिसतं. दरम्यान, वेदा या चित्रपटात महिलांविरुद्ध होणाऱ्या अन्यायाची कथा सांगण्यात आली आहे. (Bollywood)

ये जवानी है दिवानी
रणबीर कपूर आ्णि दीपिका पादूकोण यांच्या ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातील ‘बलम पिचकारी’ हे गाणं होळी स्पेशल गाण्यांच्या प्ले-लिस्टमध्ये असतंच. यंगस्टर्सची बेभान होऊन मजा मस्ती करणारी होळी कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे या गाण्यात साजरी केलेली होळी आहे असं म्हणायला हरकत नाही.

मोहब्बते
शाहरुख खानच्या ‘मोहब्बते’ चित्रपटातील ‘सोनी सोनी अखियों वाली’ हे गाणं आजही होळीला वाजवलं जातं. जगात नसलेल्या प्रेयसीसोबत गाण्यावर शाहरुख जो ठेका धरतो तो पाहण्याची मज्जाच काही और आहे.

सिलसिला
अमिताभ बच्चनआणि रेखा यांच्या ‘सिलसिला’ चित्रपटातील ‘रंग बरसे’ या गाण्याशिवाय होळी अपूर्णच आहे. ९० किंवा Genz’s असो हे गाणं जोपर्यंत वाजत नाही तो पर्यंत होळी खेळले आहोत असं वाटणारच नाही.
