“लक्ष्मीकांत मला सेटवर त्याच्या धाकट्या बहिणीसारखाच”; Renuka Shahane यांनी सांगितली

ईशान खट्टर-जान्हवी कपूरची मोठी झेप; भारताकडून ‘Homebound’ ची ऑस्कर २०२६मध्ये एन्ट्री
जागतिक स्तरावर भारतीय चित्रपटसृष्टी दिवसेंदिवस आपलं स्थान अधिक बळकट करत असल्याचं सुखद चित्र दिसत आहे… नुकतीच सिनेविश्वातील प्रतिष्ठित ‘ऑस्कर पुरस्कार २०२६’ (Oscar 2026) साठी ‘होमबाऊंड’ (Homebound Movie) या चित्रपटाची भारताकडून अधिकृत निवड करण्यात आली आहे… अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) आणि अभिनेता ईशान खट्टर यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने घेतलेली ही गगनभरारी कौतुकास्पद आहे… २०२६च्या ऑस्कर पुरस्करांमधील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्री. फीचर श्रेणीत या चित्रपटाची निवड करण्यात आली असून या दोन्ही कलाकारांच्या करिअरसाठी ही फार महत्वाची संधी आहे… (Entertainment News)

दरम्यान, दिग्दर्शक नीरज घायवान यांच्या ‘होमबाउंड’ चित्रपटाने जागतिक स्तरावर प्रेक्षकांची आणि समीक्षकांची दाद मिळवली असून २४ भारतीय चित्रपटांमधून होमबाऊंडला ऑस्करसाठी पाठवण्यात आले आहे… प्रख्यात दिग्दर्शक एन.चंद्रा या नेतृत्वाखाली परीक्षक समितीकडून या चित्रपटाची भारताकडून ऑस्करसाठी निवड केली गेली आहे. यंदाच्या २०२५ च्या टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (TIFF) होमबाउंड या चित्रपटाने इंटरनॅशनल पीपल्स चॉईस पुरस्कारासाठी उपविजेतेपदावर आपलं नाव कोरलं असून कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही होमबाऊंड चित्रपटाला ९ मिनिटांचं स्टॅंडिंग ऑवेशन मिळालं होतं…(Bollywood News)
================================
हे देखील वाचा : Deepika Padukoneचा ‘कल्की २’ मधून पत्ता कट; दीपिकाच्या करिअरला उतरती कळा लागली?
================================
‘होमबाऊंड’ चित्रपटात ईशान खट्टर (Ishaan Khattar) आणि विशाल जेठवा हे दोघे बालपणीचे मित्र दाखवले असून दोघांचंही पोलीस अधिकारी बनण्याचं स्वप्न आहे आणि त्यासाठी ते खूप मेहनतही करताना दिसतात… परंतु काही कारणास्तव त्यांना भ्रष्ट व्यवस्थेचा भाग व्हावं लागतं… त्यामुळे दोघेही नाउमेद होतात… आता पुढे नेमकं काय होतं हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल… दरम्यान, या चित्रपटात ईशान मोहम्मद शोएबचे पात्र साकारत असून विशाल चंदन कुमारच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन बॅनरखाली करण्यात आली असून येत्या २६ सप्टेंबर २०२५ रोजी भारतात हा चित्रपट रिलीज होणार आहे….
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi